बजेट घाम फोडणार नाही, फिलही थंडा थंडा कूल कूल, 900 रुपयांत खरेदी करा कुलर, इतका स्वस्त कुठे मिळतोय पाहा
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Mohan Najan
Last Updated:
गारवा वाटण्यासाठी अनेक लोक आपल्या घरात एसी तसेच कुलर हे लावत असतात. त्यासाठीच नाशिकमधील कुलर हाऊस या ठिकाणी नाशिककरांसाठी अगदी कमी पैशात आणि टिकाऊ असे कुलर हे उपलब्ध झाले आहेत.
नाशिक : उन्हाळा सुरू झाला असून सुरुवातीलाच तापमान वाढ होताना सर्वत्र दिसत आहे. गारवा वाटण्यासाठी अनेक लोक आपल्या घरात एसी तसेच कुलर हे लावत असतात. त्यासाठीच नाशिकमधील कुलर हाऊस या ठिकाणी नाशिककरांसाठी अगदी कमी पैशात आणि टिकाऊ असे कुलर हे उपलब्ध झाले आहेत.
नाशिक येथील पाथर्डी फाटा परिसरात राकेश पाटील यांचे कुलर हाऊस आहे. या दुकानात फक्त 900 रुपयांपासून कमी लाईट बिल येणारे आणि दिसायलाही सुंदर असे कुलर हे उपलब्ध आहे. राकेश पाटील यांचे स्वतःचे फॅक्टरी आउटलेट असून फॅक्टरी ते ग्राहक असा ते हा संपूर्ण कुलरचा माल देत असतात. त्यामुळे ग्राहकांना देखील खिशाला पूरक अशा वस्तू यांच्याकडे मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे.
advertisement
यांच्याकडे 900 पासून ते 9 हजारांपर्यंतचे संपूर्ण ब्रँडेड तसेच वॉरंटी असणारे हे कुलर आहेत. आणि इतकेच नाही तर यांच्याकडे अगदी छोटा असा टॉवर कुलर देखील आहे जो आपण सहज आपल्यासोबत हाताळू शकतो.
advertisement
तसेच यांचे स्वतःचे हे सर्व प्रॉडक्ट असल्याकारणाने इतरांना देखील व्यवसायात करता येईल या हेतूने यांचा हा माल होलसेल रेटने देत असतात. यांचे हे दुकान नाशिकमधील अश्विनीनगर या ठिकाणी असून छत्रपती संभाजी स्टेडियम समोर यांच्या ऑफिसला भेट देऊ शकतात.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 17, 2025 11:03 AM IST
मराठी बातम्या/Viral/
बजेट घाम फोडणार नाही, फिलही थंडा थंडा कूल कूल, 900 रुपयांत खरेदी करा कुलर, इतका स्वस्त कुठे मिळतोय पाहा









