अलीची उंची पाच फूट सहा इंच आहे. 'मी नेहमी माझ्या मित्रांपेक्षा लठ्ठ होते. पण 2018 मध्ये माझं लग्न मोडल्यावर माझा कॉन्फिडन्स कमी झाला. त्यानंतर मी स्वतः वजन कमी करण्याचा प्रयत्न केला आणि मला थोडं यश आलं, पण पुन्हा माझं वजन वाढलं. मी सर्जरी व वजन कमी करणाऱ्या औषधांचा विचार केला. कारण मी वजन कमी करण्यासाठी काहीही करायला तयार होते. पण मला कळून चुकलं की वजन कमी करण्याचा इन्स्टंट उपाय कोणताच नाही. माझ्या तब्येतीमुळे मला हार्ट अटॅक येईल, अशी भीती वाटायची,' असं अली म्हणाली.
advertisement
वापरलेल्या मोज्यांनी केलं मालामाल, करोडपती झाली व्यक्ती; नेमकं केलं काय?
'मग मी एक ग्रुप जॉइन केला. ते फिटनेसची माहिती द्यायचे. वजन कमी करण्यासाठी मी स्वतः जेवण तयार करू लागले आणि बाहेरचं खाणं बंद केलं. वजन जास्त असल्याने मी डान्स फिटनेस क्लास जॉइन केला आणि माझं वजन कमी होऊ लागलं. मी नाश्त्यात फळं, फॅट फ्री दही व ओट्स खायचे. लंचमध्ये पनीर व सॅलेड खायचे. संध्याकाळी एक प्रोटीन बार व एक ग्लास रेड वाईन प्यायचे. रात्री चिकन व सॅलेड खायचे,' अशी माहिती अलीने दिली.
Train Ticket Booking : वेटिंग तिकीट अशी कन्फर्म होईल; रेल्वेनेच सांगितली ट्रिक
रेड वाईनमध्ये रेस्वेराट्रॉल व इतर अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात, ते ब्लड शुगर कंट्रोल करतात. त्यामुळे वजन कमी होण्याची शक्यता वाढते. रेड वाईनच्या प्रभावाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया आहेत. प्राण्यांवरील रिसर्चनुसार रेड वाईनच्या सेवनाने वजन व फॅट कमी होते. मात्र याचे ठोस पुरावे नाहीत. याबद्दल रिसर्च सुरू आहेत.