Train Ticket Booking: वेटिंग तिकीट अशी कन्फर्म होईल; रेल्वेनेच सांगितली ट्रिक

Last Updated:

Train Ticket Booking: वेटिंग कन्फर्मेशनबाबत रेल्वेने महत्त्वाची माहिती दिली आहे. किती वेटिंग असल्यास तिकीट कन्फर्म होऊ शकतं आणि कन्फर्मेशनचा फॉर्म्युला काय आहे ते जाणून घेऊयात.

सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
नवी दिल्ली : रेल्वेने भारतात कोट्यवधी लोक प्रवास करतात. अनेकजण रिझर्व्हेशन करतात, पण कधीकधी त्यांचं तिकीट वेटिंग लिस्टमध्ये असतं. वेटिंग तिकीट मिळालेल्या लोकांच्या मनात संभ्रम असतो. तिकीट कन्फर्म होईल की नाही हे माहीत नसतं, त्यामुळे त्यांना ट्रिप प्लॅन करण्यात अडचणी येतात. कारण त्यांना सुट्ट्या मॅनेज करून जावं लागतं. तिकीट वेटिंग लिस्टमध्ये असलं की ते कन्फर्म होईल की नाही, याचा अंदाज बांधणं कठीण असतं. सध्या अनेक वेबसाईट्स तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता सांगतात; पण कधीकधी त्यांचंही चुकतं. हे पाहता वेटिंग कन्फर्मेशनबाबत रेल्वेने महत्त्वाची माहिती दिली आहे. किती वेटिंग असल्यास तिकीट कन्फर्म होऊ शकतं आणि कन्फर्मेशनचा फॉर्म्युला काय आहे ते जाणून घेऊयात.
सणासुदीच्या काळात ट्रेनमध्ये तिकीट कन्फर्मेशनचा मोठा गोंधळ असतो. काही गाड्यांची वेटिंग लिस्ट 500 च्या जवळपास पोहोचते. मात्र, त्या काळात कन्फर्म होण्याची शक्यता कमी होते. वेटिंग तिकीट सामान्य आणि रेल्वे इमर्जन्सी कोटा या दोन प्रकारे कन्फर्म केलं जातं.
advertisement

कंफर्म होण्याचा फॉर्म्युला

ट्रेनमध्ये रिझर्व्हेशन केल्यानंतर सरासरी 21 टक्के लोक तिकीट कॅन्सल करतात. त्यानुसार 21 टक्के वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता असते. याचा अर्थ स्लीपर कोचमधील 72 जागांपैकी सरासरी 14 सीट कन्फर्म होण्याची शक्यता असते. तसेच जवळपास चार ते पाच टक्के लोक तिकीट काढल्यानंतरही ट्रेनमधून प्रवास करत नाहीत. जर हेही त्यात धरलं तर सुमारे 25 टक्के म्हणजे एका कोचमध्ये 18 सीट कन्फर्म होऊ शकतात.
advertisement

पूर्ण ट्रेनमध्ये किती जागा कन्फर्म होऊ शकतात?

उदाहरणार्थ, कोणत्याही ट्रेनमध्ये 10 स्लीपर कोच असतील, त्यांच्या प्रत्येकी कोचमध्ये 18-18 जागा कन्फर्म होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे जवळपास 180 वेटिंग लिस्ट कन्फर्म होऊ शकते. हाच नियम थर्ड, सेकंड व फर्स्ट एसीमध्येही लागू पडतो.

आणखी जास्त वाढू शकते संख्‍या

रेल्वे मंत्रालयाचा इमर्जन्सी कोटा असतो. या कोट्यात 10 टक्के सीट राखीव असतात. त्यानुसार स्लीपर, थर्ड एसी, सेकंड एसी आणि फर्स्ट एसी यांचे वेगवेगळे नंबर असतात. कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा गरजू असेल, तर रेल्वेला कन्फर्म सीट देता यावं, यासाठी हा कोटा असतो. उदाहरणार्थ, जर 10 पैकी फक्त 5% तिकिटांना इमर्जन्सी कोट्याअंतर्गत कन्फर्म तिकिटं दिली गेली, तर वेटिंग लिस्ट कन्फर्म होण्याची शक्यता 5% नी. आणखी वाढेल.
advertisement
मराठी बातम्या/Viral/
Train Ticket Booking: वेटिंग तिकीट अशी कन्फर्म होईल; रेल्वेनेच सांगितली ट्रिक
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement