या' आहेत देशातील सर्वात स्वस्त 125cc मोटरसायकल! किंमत फक्त 82,000 रुपयांनी सुरू
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
TVS Raider, Bajaj Pulsar 125, Hero Super Splendor XTEC, Honda SP 125 आणि Hero Xtreme 125R भारतातील 5 सर्वात स्वस्त 125cc बाइक्सच्या लिस्टमध्ये सामिल आहे. चला याची किंमत आणि खासियतविषयी जाणून घेऊया.
advertisement
advertisement
TVS Raider 125 : या लिस्टमध्ये सर्वात परवडणारी बाईक आहे. बेस व्हेरिएंट (ड्रम) ची एक्स-शोरुम किंमत जवळपास ₹82000 ने सुरु होते. मायलेज जवळपास 56-60 kmpl, पॉवर 11.38 bhp, टॉर्क चांगला (11.2 Nm), LED लाइट्स, डिजिटल कंसोल, USB चार्जिंगसारखे फीचर्स मिळतात. तरुणांना ही खुप पसंत येते. कारण लूक स्पोर्टी आहे आणि रायडिंग फन आहे.
advertisement
Bajaj Pulsar 125 : पल्सर दुसऱ्या क्रमांकावर आहे. ती तिच्या स्टाइल आणि स्पोर्टीनेससाठी ओळखली जाते. बेस व्हेरिएंटची (नियन सिंगल सीट) किंमत सुमारे ₹86,000 पासून सुरू होते, तर टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत ₹95,000 पर्यंत जाते. 50-52 किमी प्रति लिटर मायलेज, 11.8 PS पॉवर, क्लासिक पल्सर ग्रिल आणि एलईडी हेडलाइट्स यामुळे ती एक उत्तम निवड बनते. कमी बजेटमध्ये पल्सरचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही आदर्श आहे. देखभाल स्वस्त आहे आणि सुटे भाग सहज उपलब्ध आहेत.
advertisement
Hero Super Splendor XTEC : ही कम्यूटर बाइक आहे. फीचर्समध्ये XTEC (डिजिटल कंसोल, Bluetooth, नेविगेशन) मिळते. किंमत बेस व्हेरिएंटसाठी ₹82,000 ने सुरु होऊन डिस्क व्हेरिएंटसाठी ₹85,000 पर्यंत जाते. मायलेज 65-70 kmpl, इंजन 124.7cc, रिफाइंड आणि कमी वायब्रेशन आहे. तुम्ही रोज लांबचा प्रवास करत असाल आणि कमी खर्च हवा असेल तर ही बेस्ट आहे.
advertisement
advertisement
Hero Xtreme 125R : या यादीतील मोटारसायकलींमध्ये याचा लूक सर्वात स्पोर्टी आहे आणि किंमतही सर्वात जास्त आहे. त्याचा बेस आयबीएस व्हेरिएंट ₹89,000 मध्ये मिळू शकतो, तर एबीएस व्हेरिएंट ₹1,04,000 पर्यंत आहे. मायलेज 65-66 kmpl आहे. त्यात शक्तिशाली इंजिन, एलईडी लाईट्स आणि डिजिटल कन्सोल आहे. तुम्ही स्पोर्टी रायडिंग आणि चांगला लूक शोधत असाल तर हा एक चांगला पर्याय असू शकतो.










