advertisement

Time Fact : जेव्हा घड्याळ नव्हतं तेव्हा माणूस वेळ कसा ओळखायचा? जुन्या काळाची ही मोजण्याची पद्धत तुम्हाला आश्चर्यचकीत करेल

Last Updated:
विज्ञानाने प्रगती केली आणि सेकंदाचा हिशोब आपल्या हातात दिला खरा, पण त्याआधीही मानवाचे व्यवहार, राजकाज आणि शेतीची कामं अगदी अचूक वेळेवर पार पडत असत. विना अलार्म आणि विना मिनिट काटा, वेळ मोजण्याची ती 'नॅचरल' पद्धत नक्की काय होती?
1/9
सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपली नजर सतत घड्याळावर असते. ऑफिसला उशीर होऊ नये, लोकल चुकली तर नाही ना, किंवा अगदी टीव्हीवरचा आवडता शो किती वाजता आहे, हे जाणून घेण्यासाठी आपण मिनिट-मिनिटाचा हिशोब ठेवतो. अलार्म वाजला नाही, तर आपलं संपूर्ण वेळापत्रक कोलमडून पडतं. पण कधी शांतपणे बसून हा विचार केलाय का की, जेव्हा हा 'टिक-टिक' करणारा काटा नव्हता, जेव्हा कोणाच्याच मनगटावर घड्याळ नव्हतं, तेव्हा आपली जुनी माणसं वेळ कशी ओळखत असतील?

2/9
विज्ञानाने प्रगती केली आणि सेकंदाचा हिशोब आपल्या हातात दिला खरा, पण त्याआधीही मानवाचे व्यवहार, राजकाज आणि शेतीची कामं अगदी अचूक वेळेवर पार पडत असत. विना अलार्म आणि विना मिनिट काटा, वेळ मोजण्याची ती 'नॅचरल' पद्धत नक्की काय होती? चला, काळाच्या मागे वळून पाहूया.

3/9
घड्याळाशिवाय कसं चालायचं जग?घड्याळाचा शोध 15 व्या शतकाच्या आसपास लागला असला तरी, मानवाने त्याआधी हजारो वर्षांपूर्वीच वेळेला आपल्या मुठीत केलं होतं. फक्त त्याचं स्वरूप आजच्यासारखं डिजिटल नव्हतं, तर ते निसर्गाशी जोडलेलं होतं. चला वेळ पाहण्याचा काही जुन्या पद्धतींबद्दल जाणून घेऊ.

4/9
1. सूर्याची सावली: जगातील पहिलं 'घड्याळ'प्राचीन काळी वेळ मोजण्याचं सर्वात मोठं साधन म्हणजे 'सूर्य'. जमिनीवर एक काठी किंवा खांब रोवला जायचा. सूर्याच्या बदलत्या स्थानानुसार त्या काठीची सावली लांब किंवा आखूड होत असे. या सावलीच्या लांबीवरून दिवसाचा कोणता भाग सुरू आहे, हे ओळखलं जाई. भारतात यावरूनच दिवसाची विभागणी 'प्रहरां'मध्ये करण्यात आली होती.

5/9
2. 'प्रहर' म्हणजे काय? (वेळेचं भारतीय गणित)आज आपण दिवसाचे 24 तास मानतो, पण प्राचीन भारतीय पद्धतीत अहोरात्र (दिवस आणि रात्र) मिळून आठ प्रहर मानले जायचे. दिवसाचे चार प्रहर: सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत. रात्रीचे चार प्रहर: सूर्यास्तापासून पुन्हा सूर्योदयापर्यंत. एका प्रहराचा काळ साधारण तीन तासांचा असे. म्हणूनच आजही आपण 'दुपार' (दोन प्रहर उलटून गेल्यावर) हा शब्द सहज वापरतो.
2. 'प्रहर' म्हणजे काय? (वेळेचं भारतीय गणित)आज आपण दिवसाचे 24 तास मानतो, पण प्राचीन भारतीय पद्धतीत अहोरात्र (दिवस आणि रात्र) मिळून आठ प्रहर मानले जायचे.दिवसाचे चार प्रहर: सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत. रात्रीचे चार प्रहर: सूर्यास्तापासून पुन्हा सूर्योदयापर्यंत. एका प्रहराचा काळ साधारण तीन तासांचा असे. म्हणूनच आजही आपण 'दुपार' (दोन प्रहर उलटून गेल्यावर) हा शब्द सहज वापरतो.
advertisement
6/9
3. रात्रीची वेळ कशी कळायची?दिवसा सूर्याचा आधार होता, पण रात्री काय? रात्रीच्या वेळी आपले पूर्वज चंद्र आणि नक्षत्रांच्या हालचालींवरून वेळ ठरवत असत. चंद्राचा आकार, त्याची आकाशातील स्थिती आणि विशिष्ट ताऱ्यांचं उगवणं-मावळणं पाहून अनुभवी लोक सांगायचे की रात्रीचा कितवा प्रहर सुरू आहे.

7/9
4. जगातील इतर अनोखी साधनं: पाणी आणि वाळूकेवळ भारतच नाही, तर जगभरात वेळेसाठी अजब प्रयोग झाले: जलघटिका (Water Clock): सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी ग्रीस आणि भारतातही पाण्याचे पात्र वापरले जाई. एका पात्रातून दुसऱ्या पात्रात ठराविक वेगाने पाणी पडायचे. पाणी एका विशिष्ट स्तरावर आले की आवाज व्हायचा किंवा घंटा वाजायची, ज्यातून वेळ कळायची. वाळूचे घड्याळ (Hourglass): समुद्रातील प्रवासात जहाजांवर वेळेचा अंदाज घेण्यासाठी वाळूच्या घड्याळांचा मोठ्या प्रमाणावर वापर व्हायचा.
4. जगातील इतर अनोखी साधनं: पाणी आणि वाळूकेवळ भारतच नाही, तर जगभरात वेळेसाठी अजब प्रयोग झाले:जलघटिका (Water Clock): सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी ग्रीस आणि भारतातही पाण्याचे पात्र वापरले जाई. एका पात्रातून दुसऱ्या पात्रात ठराविक वेगाने पाणी पडायचे. पाणी एका विशिष्ट स्तरावर आले की आवाज व्हायचा किंवा घंटा वाजायची, ज्यातून वेळ कळायची.वाळूचे घड्याळ (Hourglass): समुद्रातील प्रवासात जहाजांवर वेळेचा अंदाज घेण्यासाठी वाळूच्या घड्याळांचा मोठ्या प्रमाणावर वापर व्हायचा.
advertisement
8/9
5. निसर्गाचा अलार्म: पशू-पक्षीघड्याळाचा गजर होण्यापूर्वी निसर्गाचे आपले वेगळे अलार्म होते. पहाटे कोंबड्याची आरवणं, पक्ष्यांचा किलबिलाट किंवा रात्री ठराविक वेळी होणारी किरकिर, यावरून ग्रामीण भागात आजही लोक वेळेचा अचूक अंदाज लावतात.

9/9
आज आपल्याकडे सेकंदाचा अचूक हिशोब देणारी घड्याळं आहेत, पण जुन्या काळातली 'प्रहर' पद्धत माणसाला निसर्गाच्या अधिक जवळ ठेवत असे. काळ बदलला, साधनं बदलली, पण वेळ मात्र आपली संथ चाल आजही टिकवून आहे.

Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement