advertisement

साध्वीचा रहस्यमयी मृत्यू! कोण आहे प्रेम बाईसा, जी देशभर चर्चेत आली आहे, तिच्या मृत्यूचं गूढ काय?

Last Updated:

सध्या देशभर चर्चेत असलेली एक साध्वी, प्रेम बाईसा. जिचा मृत्यू झाला आहे आणि तो रहस्यमयी असल्याचं सांगितलं जात आहे. साध्वी प्रेम बाईसाच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

News18
News18
अजमेर : प्रेम बाईसा, राजस्थानातील ही साध्वी, एक कथावाचक सध्या देशभर चर्चेत आली आहे. तिचा मृत्यू झाला आहे. संशयास्पद परिस्थितीत झालेल्या तिच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. तिचा मृत्यू सगळ्यांसाठी एक रहस्य बनला आहे. तिच्यासोबत नेमकं काय झालं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
साध्वी बाईसा काही दिवसांपूर्वीच चर्चेत आली होती. सोशल मीडियावर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर तिनं हे फोटो व्हिडीओ एआय जनरेटेड असल्याचं सांगत ब्लॅकमेलिंगसाठी बनवल्याचा आरोप तिने केला.
सदर व्हिडिओबाबत तिने सोशल मीडियावर म्हटलं आहे की, 'तो व्हिडिओ माझ्या वडिलांसोबतचा होता' ज्या व्यक्तीने तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला त्याच्याविरुद्ध तिने पोलिसात तक्रार दाखल केली आणि त्याला अटक झाली. तिने सांगितलं की, अटक झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी माफी मागितली. मोठे मन असलेल्यांनी त्याला माफ केलं. यानंतर तुरुंगातून बाहेर येताच त्याने व्हिडिओ एडिट करून तो व्हायरल केला.
advertisement
साध्वी प्रेम बाईसाचा मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी साडेपाचच्या सुमारा तिला तिचे वडील आणि एक तरुण कारमधून बोरानाडातील आश्रमहून पालरोडवरील प्रेक्षा रुग्णालयात घेऊन आले होते.
प्रेक्षा रुग्णालयाचे डॉ. प्रवीण जैन यांनी सांगितलं की, साध्वीला जेव्हा रुग्णालयात आणलं तेव्हा तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले पण कित्येक प्रयत्नानंतर तिच्या शरीरात कोणतीच हालचाल दिसली नाही. त्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आलं. तिच्या वडिलंनी तिला ताप असल्याने आश्रमात नर्सिंग स्टाफ बोलावून तिला इंजेक्शन देण्यात आल्याचं सांगितलं.
advertisement
तिच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह महात्मा गांधी रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. प्रेक्षा रुग्णालयाकडून रुग्णावाहिकाही दिली जात होती. पण तिच्या वडिलांनी नकार दिला. प्रायव्हेट गाडीतून ते मृतदेह घेऊन गेले.
साध्वी प्रेम बाईसा प्रकरणातील सुसाईड नोट
साध्वी प्रेम बैसा यांच्या मृत्यूनंतर एक सुसाईड नोट समोर येत असल्याचं वृत्त आहे. पण त्यांच्या मृत्यूच्या चार तासांनंतर ही सुसाई़ड नोट सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली.
advertisement
साध्वाची सुसाईड नोट म्हणून व्हायरल केल्या जाणाऱ्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मी प्रत्येक क्षणी सनातनचा प्रचार केला. जगात सनातन धर्माशिवाय कोणता मोठा धर्म नाही. आज शेवटच्या श्वासातही माझ्या हृदयात सनात आहे. मी सनातन धर्मात जन्मले हे माझं सौभाग्य. शेवटचा श्वासही सनातनसाठी. माझ्या आयुष्यातील माझे गुरू जगतगुरु शंकराचार्य भगवान, विश्व योग गुर आणि पूज्य संत महात्मा आशीर्वाद माझ्यावर सदैव राहिला. मी आदि गुरू शंकराचार्य आणि देशाच्या अनेक महान संत-महात्मांना पत्र लिहिलं. अग्निपरीक्षेसाठी निवेदन केलं. पण निसर्गाला काय मंंजूर होतं? मी या जगाचा कायमचा निरोप घेत आहे पण माझे देव आणि पूज्य संत महात्मांवर विश्वास आहे, माझ्या जिवंतपणी नाही तर मी गेल्यानंतर तरी मला न्याय मिळेल.
advertisement
सुसाईड नोटबाबत संशय
रुग्णालयातील सूत्रांचे म्हणणं आहे की साध्वी यांचं निधन संध्याकाळी 5.30 च्या सुमारास झालं, तर त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रात्री साडेनऊच्या सुमारास एक लांबलचक पोस्ट करण्यात आली. हे कसं शक्य आहे?
मृत्यूनंतर 4 तासांनी सोशल मीडिया पोस्ट, वडिलांचा पोस्टमॉर्टेमधील नकार आणि आश्रममातील सीसीटीव्ही गायब यावरून साध्वीच्या अनुयायी त्यांचा मृत्यूला संशयास्पद म्हटलं आहे.  यावरूनच आरती नगरमधील आश्रमात रात्री हंगामा झाला. काहीतरी लपवलं जात आहे, असा आरोप लोकांनी केला. साध्वीच्या गाडीची तपासणी, पोस्टमॉर्टेम करण्याची मागणी झाली. आश्रमाचे सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्याची मागणी होते आहे. साध्वीच्या मृत्यूचं राज लपवण्यासाठी हे फुटेज गायब केल्याचा आरोप होतो आहे. शेवटी रात्री उशिरा साध्वीला महात्मा गांधी रुग्णालयात नेण्यात आलं. लोकांच्या दबावामुळे पोस्टमॉर्टेम करण्यात आलं.
advertisement
advertisement
साध्वीचा मृत्यू रुग्णालयात नेण्याआधी झाला की नंतर याबाबत काही माहिती नाही. एसीपी (वेस्ट) छवी शर्मा यांनी सांगितलं की, संपूर्ण प्रकरणाच्या तपासानंतरच काहीतरी सांगू शकतो, असं पोलिसांनी सांगितलं.
कोण आहे प्रेम बाईसा?
साध्वी प्रेम बाईसाने तिचं जीवन भक्ती, सेवा आणि सामाजिक सुधारणांसाठी समर्पित केलं. पश्चिम राजस्थानच्या ग्रामीण भागात कथाकथन आणि भजन गायनासाठी ओळखली जात असे. तिला बालसाध्वी म्हणून ओळखलं जात असे आणि तिच्या प्रवचनांमध्ये नैतिकता, कौटुंबिक मूल्ये आणि अध्यात्मावर भर दिला जात असे.
ती महंत वीरमनाथ (वीरमनाथ) यांची शिष्या होती, जे तिचे वडील. महंत वीरमनाथ हे देखील धार्मिक जगात एक आदरणीय व्यक्ती होते, ते कुटीर आश्रमात राहत होते.
साध्वीच्या कथाकथन सत्रांना मोठ्या संख्येने विशेषतः बाडमेर, जोधपूर आणि आसपासच्या भागातील भाविक असायचे.  साध्वींना एक समर्पित धार्मिक व्यक्ती म्हणून प्रतिष्ठा होती, पण व्हायरल व्हिडिओने तिच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
view comments
मराठी बातम्या/देश/
साध्वीचा रहस्यमयी मृत्यू! कोण आहे प्रेम बाईसा, जी देशभर चर्चेत आली आहे, तिच्या मृत्यूचं गूढ काय?
Next Article
advertisement
Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement