advertisement

'सतत लोकांना भडकवणारं...' अजित पवारांच्या निधनावर ट्रोल करणाऱ्यांना सलील कुलकर्णींनी झापलं; शेअर केली जळजळीत पोस्ट

Last Updated:
Ajit Pawar death: बारामतीच्या दुर्दैवी विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी प्राण गमावले. मात्र, या दुःखाच्या प्रसंगीही सोशल मीडियावर नकारात्मक कमेंट्सचा पूर आल्याचं पाहायला मिळतंय.
1/8
बारामतीच्या त्या दुर्दैवी विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी प्राण गमावले आणि अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. एका कर्तबगार नेतृत्वाचा असा भीषण अंत व्हावा, या कल्पनेनेच सर्वसामान्य जनता सुन्न झाली आहे.

2/8
मात्र, या दुःखाच्या प्रसंगीही सोशल मीडियावर नकारात्मक कमेंट्सचा पूर आल्याचं पाहायला मिळतंय. या असंवेदनशीलतेवर प्रसिद्ध गायक आणि संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले असून, ट्रोलर्सची चांगलीच कानउघडणी केली आहे.

3/8
अजित दादांच्या निधनानंतर सोशल मीडियावर काही युजर्स राजकीय द्वेषातून किंवा वैयक्तिक आकसामुळे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन कमेंट्स करत होते. हे पाहून सलील कुलकर्णी यांनी फेसबुक आणि वर एक पोस्ट शेअर करत आपली चीड व्यक्त केली.

4/8
त्यांनी सवाल केला,
त्यांनी सवाल केला, "सोशल मीडियावर बोलताना आपल्याला थोडा संयम ठेवता येईल का? सतत नकारात्मक किंवा लोकांना भडकवणारं बोलायलाच पाहिजे असं काही नसतं. काही वेळा... काही क्षण... थोडे संवेदनशीलतेने जगता येईल का?"
advertisement
5/8
सलील यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत जिव्हाळ्याचा मुद्दा मांडला. ते म्हणाले,
सलील यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत जिव्हाळ्याचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, "अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री होतेच, पण त्याही पलीकडे ते कुणाचे तरी वडील होते, कुणाचे पती, कुणाचे भाऊ आणि कुणाचे तरी काका होते. कृपया थोडं जबाबदारीने आणि संवेदनशीलपणे वागूया." राजकीय मतभेद बाजूला ठेवून एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर किमान माणुसकी जपली जावी, अशी आर्त हाक त्यांनी दिली आहे.
advertisement
6/8
बुधवारी सकाळी ८.१० मिनिटांनी अजित दादा 'लियरजेट ४५ एक्सआर' विमानाने मुंबईतून बारामतीकडे झेपावले होते. सगळं काही सुरळीत सुरू होतं, पण ८.४० च्या सुमारास, जेव्हा विमान धावपट्टीच्या अगदी जवळ होतं, तेव्हा तांत्रिक बिघाड झाला.

7/8
पायलटने विमान वाचवण्याचे दोन आटोकाट प्रयत्न केले, पण ८.४६ मिनिटांनी नियंत्रण सुटलं आणि विमान शेतात कोसळलं. या अपघातात दादांसोबतच कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, पिंकी माळी आणि विदीप जाधव या निष्पाप जीवांचाही अंत झाला.

8/8
सलील कुलकर्णी यांनी याआधीही
सलील कुलकर्णी यांनी याआधीही "विश्वासच बसत नाही... अजितदादा!" अशी पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती. केवळ सलीलच नाही, तर संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीने आज आपली कामं थांबवून दादांना श्रद्धांजली वाहिली आहे.
advertisement
Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement