Road Safety : रस्त्यात कुठेही खड्डं दिसलं की पोहोचतो बुजवायला! ना पालिकेकडे तक्रार, ना कुणाची मदत, युवराजची अशीही कहाणी
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
शहर मोठं असो वा लहान, समस्या सगळीकडेच असतात. युवराज हा छत्रपती घरातील रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचं काम करतो.
छत्रपती संभाजीनगर : शहर मोठं असो वा लहान, समस्या सगळीकडेच असतात. पण त्या समस्यांकडे बोट दाखवणारे खूप असतात,
आणि त्या सोडवण्यासाठी पुढे येणारे फारच कमी. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरातील तरुण युवराज क्षीरसागर. युवराज हा छत्रपती घरातील रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचं काम करतो.
युवराज क्षीरसागर हा मूळचा छत्रपती संभाजीनगर शहरातला आहे. युवराजचे 11 वी पर्यंतचे शिक्षण झालेलं आहे. शहरामध्ये त्याचा एक छोटासा व्यवसाय आहे. युवराज सांगतो की, 2007 साली मी जालन्यावरून शहरामध्ये परत आलो, तेव्हा एका ठिकाणी मोठा खड्डा होता. त्या वेळेस युवराज याचा अपघात झाला होता.
advertisement
त्यानंतर त्याने ठरवले की, आपण शहरामध्ये खड्डे बुजवण्याचे काम करूयात. पण तेव्हा त्याच्याकडे पैसे पण नव्हते आणि मनुष्यबळ नव्हते, त्यामुळे त्याने तो विचार तिथेच सोडून दिला. त्यानंतर परत 2013 साली त्याच्या डोक्यात विचार आला की, आपण हे काम करूयात. पण त्याचे काही मित्र किंवा जवळच्या मंडळींनी त्याला सांगितलं की, हे काम तुझं नाही आहे, तू करू नको. त्यामुळे त्याने परत ते काम केलं नाही.
advertisement
पण गेल्यावर्षीपासून त्याने ठरवलं की, आता आपण हे काम करायचं. त्याच्याकडे पैसे पण होते आणि मनुष्यबळ पण होतं. मग दररोज सकाळी तो संपूर्ण शहरामध्ये चक्कर मारतो. शहरामध्ये बघतात, कुठे खड्डे आहेत, कुठे खड्डे नाहीयेत किंवा कुठला खड्डा लवकर बुजवण्याचं काम आहे, असा तो रोज सर्व्हे करतो. यामध्ये त्याला त्याचे मित्र देखील मदत करतात, त्यासोबत त्याच्याकडे कामाला जे मुल आहेत ते देखील यामध्ये त्याला मदत करतात.
advertisement
हे खड्डे बुजवण्यासाठी जो पण खर्च येतो, तो स्वतः युवराज करतो. यासाठी तो कोणाची मदत घेत नाहीत. आतापर्यंत त्याला एक लाखापेक्षा जास्त खर्च यासाठी आलेला आहे. साधारणपणे एक खड्डा बुजवण्यासाठी एक हजार रुपये एवढा खर्च लागतो. अशा पद्धतीने तो काम करतो.
त्यासोबतच युवराज याने YouTube आणि इंस्टाग्राम वरती स्वतःचा एक पेज ओपन केले आहे. 'bhau mh 20' नावाने त्याचे इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती पेज आहे. यावरती देखील तो खड्डे बुजवण्याच्या संदर्भात जनजागृती करतो.
advertisement
आपण सर्वांनी मी जे खड्डे बुजवतो त्यासाठी मला सहकार्य करावे. यासाठी मला कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत नको आहे, फक्त सहकार्य हवे आहे. जेणेकरून आपले छत्रपती संभाजीनगर हे खड्डे मुक्त शहर होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पण तुम्ही देखील आम्हाला मदत करा, असं आवाहन युवराज क्षीरसागर याने केलं.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 5:28 PM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
Road Safety : रस्त्यात कुठेही खड्डं दिसलं की पोहोचतो बुजवायला! ना पालिकेकडे तक्रार, ना कुणाची मदत, युवराजची अशीही कहाणी
title=तरुण युवराज क्षीरसागर बुजवते शहरातील खड्डे





