advertisement

अडीच वर्षांची साथ अडीच सेकंदात तुटली, बायको पिंकीचं दर्शन घेताना नवरा उन्मळून पडला

Last Updated:

विमान उतरायला काही सेकंद शिल्लक असताना अपघातात विमानातील पाचही जणांचा जीव गेला. फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी हिचेही निधन झाले

पिंकी माळी
पिंकी माळी
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच विमान अपघातात फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी हिचे निधन झाले. २९ वर्षीय पिंकीच्या कुटुंबाचे वास्तव्य मुंबईत होते. याआधीही पिंकीने अजित पवार यांच्यासोबत विमान प्रवास केला होता.
जिल्हा परिषद निवडणुकांच्या निमित्ताने अजित पवार प्रचारासाठी बारामती येथे जात होते. विमान उतरायला काही सेकंद शिल्लक असताना अपघातात विमानातील पाचही जणांचा जीव गेला. आपल्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात केलेल्या पिंकीनेही जीव गमावला. अडीच वर्षांपूर्वीच तिने आपल्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली होती.
पिंकीचे पार्थिव गुरूवारी मुंबईतल्या सासरच्या आणि माहेरच्या घरी आणण्यात आले. त्यावेळी बायकोचा पार्थिव देह पाहून तिच्या नवरा गलबलून गेला. पिंकीच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन तिचा नवरा हुंदक्यांनी दाटला, धायमोकलून रडला. बारामती विमानतळाची धावपट्टी केवळ ५०० मीटर अंतरावर असताना त्यांच्या विमानाला अपघात होऊन, यातच त्यांचे दुर्दैवी निधन झाले. अडीच वर्षांपूर्वी वैवाहिक आयुष्याला सुरुवात केल्यानंतर केवळ अडीच सेकंदासाठी पिंकीने जीव गमावल्याची भावना कुटुंब व्यक्त करीत आहे.
advertisement

पिंकीचे वडील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, अजितदादांशी बोलण्याचा प्रयत्न पण...

पिंकी माळी हिने आधीही अजित पवार यांच्यासोबत विमानात एकत्र प्रवास केला. गेल्या काही दिवसांतील पिंकीचा अजित पवार यांच्यासोबत तिसरा विमान प्रवास होता. पिंकीचे वडील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याने त्यांना अजित पवार यांच्यासोबत बोलायचे होते. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने त्यांना अजित पवार सोबत असताना फोन केला. परंतु वडील शिवकुमार गाडी चालवत असल्यामुळे ते फोन घेऊन शकले नाहीत. त्यामुळे लेकीने मध्यस्थी करूनही शिवकुमार यांचे अजित पवार यांच्याशी बोलणे होऊ शकले नाही.
advertisement
पिंकीचा 'तो' फोन अखेरचा ठरला...
अजित पवार यांच्यासोबतचा प्रवास झाल्यानंतर पिंकी हॉटेलमध्ये जाऊन घरी फोन करणार होती. प्रवासाला सुरुवात होण्याआधी तिने कुटुंबाला कळवले होते. मात्र तोच फोन आणि आवाज कुटुंबासाठी अखेरचा ठरला.
अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला, ही बातमी आम्ही टीव्हीवरून पाहिला. जेव्हा माझ्या मुलीचे नाव टीव्हीवर आले तेव्हा आम्हाला फार मोठा धक्का बसला. आम्ही आमच्या मुलीला गमावले, हा धक्का आमच्यासाठी सहन करण्याच्या पलीकडचा होता, असे शिवकुमार यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अडीच वर्षांची साथ अडीच सेकंदात तुटली, बायको पिंकीचं दर्शन घेताना नवरा उन्मळून पडला
Next Article
advertisement
Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement