The Bone Church : जगातील एकमेव चर्च, जिथे आहेत 40,000 लोकांची हाडं! रंजक आहे यामागची कथा
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Human bones church : तुम्ही अशा चर्चची कल्पना करू शकता का, जिथे चारही बाजूंनी हजारो लोकांचे सांगाडे असतील? आम्ही कुठल्याही चित्रपटातील किंवा भूत-प्रेतांच्या गोष्टीतील भयानक चर्चबद्दल बोलत नाही आहोत. प्रत्यक्षात असे एक चर्च आहे, जिथे झुंबरापासून सजावटीतील प्रत्येक वस्तू मानवी सांगाड्यांपासून बनवलेली आहे. याला अस्थिकलश आणि 'चर्च ऑफ बोन्स' असेही म्हणतात.
advertisement
advertisement
चर्चच्या आत सर्वात जास्त आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे मधोमध लटकवलेला मोठा झुंबर. हा झुंबर पूर्णपणे माणसांच्या हाडांपासून बनवलेला आहे आणि असे सांगितले जाते की, त्यात मानवी शरीरातील प्रत्येक हाडाचा समावेश आहे. याशिवाय श्वार्झेनबर्ग कुटुंबाचा कोट ऑफ आर्म्स देखील पूर्णपणे मानवी हाडांपासून बनवलेला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
यानंतर 1870 साली स्थानिक लाकूड कारागीर फ्रांतिशेक रिंट यांना येथील हाडे सजवण्याचे काम देण्यात आले. त्यांनी हाडे स्वच्छ केली, त्यांना कलेचे रूप दिले आणि चर्चला असे रूप दिले, जे आज संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करते. येथे सुमारे 40,000 लोकांची हाडे आहेत. हे ठिकाण पर्यटकांसाठी खुले आहे. येथे तिकीट घेऊन आत जाता येते.
advertisement







