advertisement

Cooking Habits : स्वयंपाकातल्या दहा चुकीच्या गोष्टी देतात पोटाला त्रास, सवयी आताच बदला, पोटाचं आरोग्य राहिल परफेक्ट

Last Updated:

IBS म्हणजेच आतडी संवेदनशील - नाजूक  होतात, पचनसंस्थेवर तीव्र परिणाम होतो. स्वयंपाकातल्या चुकांमुळे याची लक्षणं वाढू शकतात.  कळत नकळतपणे या चुका तुमच्याही घरात होत असतील तर स्वयंपाकाचं आणि पोटाचं नातं समजून घेण्याची गरज आहे. 

News18
News18
मुंबई : स्वयंपाकघरात काय आणि कसं शिजतं यावर आपल्या पोटाचं आरोग्य ठरतं. कारण योग्यरित्या शिजवलेल्या अन्नामुळे शरीराला पोषण मिळतं. स्वयंपाकाच्या चुकीच्या सवयींमुळे पचनक्रिया बिघडते. यामुळे काहींना इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) चा त्रास होऊ शकतात.
IBS म्हणजेच आतडी संवेदनशील - नाजूक  होतात, पचनसंस्थेवर तीव्र परिणाम होतो. स्वयंपाकातल्या चुकांमुळे याची लक्षणं वाढू शकतात.  कळत नकळतपणे या चुका तुमच्याही घरात होत असतील तर स्वयंपाकाचं आणि पोटाचं नातं समजून घेण्याची गरज आहे.
जास्त तेलकट आणि तळलेले पदार्थ - तेल आणि तूप जास्त वापरल्याने अन्न जड होतं. त्यामुळे पचनक्रिया मंदावते आणि आम्लता, गॅस आणि पोटफुगी वाढते. आयबीएस रुग्णांसाठी हे आणखी हानिकारक आहे.
advertisement
भाज्या जास्त शिजवणं - भाज्या जास्त शिजवल्यानं त्यांचे पोषक घटक आणि फायबर नष्ट होतात. यामुळे अन्न कमी पौष्टिक होतं आणि आतड्यांवर दबाव येतो.
झटपट मसाले आणि सॉस - तयार मसाले आणि सॉसमध्ये प्रिझर्वेटिव्ह्ज, मीठ आणि रसायनं जास्त असतात. यामुळे आतड्यांना त्रास होऊ शकतो आणि IBS ची लक्षणं वाढू शकतात.
advertisement
मसालेदार पदार्थ - जास्त मसाले आणि आंबट चवीमुळे पोटाच्या आवरणाला नुकसान होवू शकतं, ज्यामुळे पोटदुखी, छातीत जळजळ आणि जुलाब होतात.
तेल वारंवार गरम करणं - तळण्यासाठी तेच तेल वापरणं अत्यंत हानिकारक आहे. त्यात विषारी पदार्थ जमा होतात, जे आतड्यांसंबंधी आरोग्याला हानी पोहोचवू शकतात.
रिफाइंड पीठ आणि भात - रिफाइंड पीठ आणि पॉलिश केलेल्या तांदळात फायबरचं प्रमाण खूप कमी असतं.
advertisement
फायबरच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठता आणि आयबीएससारख्या समस्या उद्भवू शकतात.
प्रक्रिया केलेलं अन्न - प्रोसेस्ड फूड - नूडल्स, इन्स्टंट सूप किंवा इतर पॅकेज केलेल्या अन्नात सोडियम आणि एडिटीव्हचं प्रमाण जास्त असतं. यामुळे आतड्यांना सूज येणं आणि पोटाचा त्रास वाढू शकतो.
advertisement
अन्न वारंवार गरम करणं - उरलेलं अन्न पुन्हा गरम केल्यानं त्यातील पोषक घटक नष्ट होतात. बॅक्टेरिया वाढण्याचा धोका वाढतो, जो पचनासाठी हानिकारक असतो.
जास्त मसालेदार आणि जाड ग्रेव्ही - जास्त ग्रेव्ही असलेलं अन्न पचण्यास कठीण असतं. यामुळे आतड्यांवर दबाव येतो आणि पोटात जडपणा आणि गॅसची भावना वाढते.
डाळी न भिजवता डायरेक्ट शिजवणं - डाळी भिजवल्याशिवाय शिजवल्यानं शरीरात गॅस निर्माण करणारे घटक सक्रिय राहतात, ज्यामुळे पोटफुगी आणि पेटके येऊ शकतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cooking Habits : स्वयंपाकातल्या दहा चुकीच्या गोष्टी देतात पोटाला त्रास, सवयी आताच बदला, पोटाचं आरोग्य राहिल परफेक्ट
Next Article
advertisement
Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement