शेवटचं दर्शनही मिळालं नाही, अजित दादांच्या चितेसमोर सूरज चव्हाणनं डोकं टेकवलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Suraj Chavan Ajit Pawar Funeral : सूरज चव्हाण अजित दादांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचला. पण सूरजला दादांना अखेरचं पाहता आलं नाही शेवटी त्यांच्या जळत्या चितेसमोर त्यानं डोकं टेकवलं. काळीज पिळवटून टाकणारा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. 28 जानेवारीला विमान अपघातात त्यांचं निधन झालं. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अजित दादांवर अंत्यसंस्कार पार पडले. या अंत्यसंस्कारासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. याच गर्दीत दादांचा लाडका सूरज चव्हाणही आला होता. सूरज चव्हाण जड अंत: करणाने अजित दादांना शेवटचा निरोप देण्यासाठी पोहोचला होता. सूरजला दादांना अखेरचं पाहता आलं नाही शेवटी त्यांच्या जळत्या चितेसमोर त्यानं डोकं टेकवलं. काळीज पिळवटून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे.
लाखोंच्या गर्दीत कोणी ओळखू नये म्हणून सूरज चव्हाणने आपल्या चेहऱ्यावर रूमाल बांधला होता. इतर नागरिकांप्रमाणेच सूरज चव्हाण देखील रांगेत उभा राहून दादांच्या शेवटच्या दर्शनाची वाट पाहत होता. लाखोंच्या गर्दीत सूरजने शेवटपर्यंत वाट पाहिली. गर्दी थोडी कमी झाल्यावर सूरज चव्हाण अजित दादांच्या अंत्यदर्शनासाठी पुढे गेला.
advertisement
सूरज चव्हाणने दादांची अखेरची भेट घेऊपर्यंत खूप उशिर झाला होता. अजित दादांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला होता. त्यामुळे सूरजला दादांचं शेवटचं दर्शन घेता आलं नाही. अत्यंत जड अंत: करणाने सूरज चव्हाणने दादांच्या जळत्या चितेसमोरच डोकं टेकवलं.
अंत्यसंस्कारानंतर सूरज चव्हाणने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपल्या भावना शब्दांत व्यक्त केल्यात. त्याने पोस्टमध्ये लिहिलं, "आई-वडिलांनंतर मी तुमच्यात माझे आई-आप्पा पाहात होतो आणि तुम्ही पण मला सोडून गेलात. आता या पोरक्या सूरजने कोणाकडे बघायचं MISS YOU DADA." सूरजचा व्हिडीओ, त्याचं दादांवरच प्रेम, त्यांना भेटण्यासाठीची तळमळ हे सगळं पाहून सगळ्यांचेच डोळे पाणावले आहेत.
advertisement
advertisement
सूरज चव्हाण आणि अजित पवार यांचं अत्यंत भावनिक नातं होतं. अजित दादांना तो देव मानायचा. आई-वडिलांसारख्या मायेच्या नजरेने पाहत होता. दादांनी सूरज चव्हाणला एक नवं आयुष्य उभं करून दिलं. सूरज चव्हाणला बारामतीच्या मोढवे गावात त्याचं हक्काचं घर बांधून दिलं.
सूरज चव्हाण तसंच अभिनेता रितेश देशमुख देखील अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचला होता. रितेशनं त्याच्या बिग बॉसच्या शूटींगमधून वेळ काढून अजित दादांना शेवटचा निरोप दिला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 3:13 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
शेवटचं दर्शनही मिळालं नाही, अजित दादांच्या चितेसमोर सूरज चव्हाणनं डोकं टेकवलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO









