वापरलेल्या मोज्यांनी केलं मालामाल, करोडपती झाली व्यक्ती; नेमकं केलं काय?
- Published by:Priya Lad
- trending desk
Last Updated:
Servant became millionaire by selling kings socks : हैदराबादचा सहावा निजाम एकदा वापरलेले मोजे पुन्हा वापरत नसे. आबिदने याचा फायदा घेतला. तो ते मोजे स्वत: घेऊन जायचा किंवा काही दिवसांनी पुन्हा निजामालाच ते मोजे विकायचा.
नवी दिल्ली : मीर मेहबूब अली खान हे हैदराबादचे सहावे निजाम होते. 1869 मध्ये ते सर्वांत श्रीमंत आणि सर्वांत शक्तिशाली हैदराबाद राज्याच्या गादीवर बसले होते. त्यांच्याबद्दल अनेक रंजक कथा सांगितल्या जातात. निजाम मेहबूब अली यांना वैयक्तिक आयुष्यात चांगल्या वस्तू वापरण्याची आवड होती. त्यांच्यावर पाश्चात्य संस्कृतीचा खूप प्रभाव होता. त्यांनी शिक्षण देखील पाश्चात्य पद्धतीने घेतलं होतं. मेहबूब अली यांना फ्रेंच फॅशनची आवड होती. कारण, त्या काळात फ्रेंच फॅशनची जगभरात चर्चा होती. निजाम पायात घालण्याचे मोजे देखील फ्रान्समधून आयात करत असत. मोज्याची एक जोडी एकदा वापरून ते टाकून देत असत.
निजामाच्या या सवयीचा त्यांच्या एका नोकराला फार फायदा झाला. अल्बर्ट आबिद नावाची एक अर्मेनियन व्यक्ती मेहबूब खान यांचा विश्वासू सेवक आणि जणू उजवा हातच होता. प्रसिद्ध हैदराबादी इतिहासकार डी. एफ. कारका यांनी लिहिलेल्या माहितीनुसार, जेव्हा मेहबूब अली खान आपले कपडे बदलत असायचे तेव्हा आबिद तिथे हजर असायचा. निजामाला मदत करणं, हे त्याचं काम होतं. तो निजामाचे कपडे, बूट, घड्याळं, दागिने आणि इतर वस्तूंची काळजी घेत असे. निजाम एकदा वापरलेले मोजे पुन्हा वापरत नसे. आबिदने याचा फायदा घेतला. तो ते मोजे स्वत: घेऊन जायचा किंवा काही दिवसांनी पुन्हा निजामालाच ते मोजे विकायचा.
advertisement
अल्बर्ट आबिदने निजामाची फसवणूक करून भरपूर पैसे कमवले होते. या पैशांतून त्याने हैदराबादमध्ये एक मोठं डिपार्टमेंटल स्टोअर उघडलं. हे डिपार्टमेंटल स्टोअर 'आबिद' या नावाने ओळखलं जात होतं. आता हे डिपार्टमेंटल स्टोअर अस्तित्वात नाही; पण ते ज्या ठिकाणी होतं ती जागा आता देखील 'आबिद स्क्वेअर' नावाने ओळखली जाते.
advertisement
पाहुण्यांकडून घेत असे कमीशन
तसंच, जेव्हा एखादा व्यापारी आपल्या वस्तू विकण्यासाठी निजामाला भेटण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा आबिद त्याच्याकडून बक्कळ कमिशन घेत असे. निजामाला वस्तू सादर केल्या जाण्यापूर्वी आबिद त्या स्वीकारल्या जातील किंवा नाकारल्या जातील, याबाबत माहिती देत असे. आबिदच्या मते ज्या वस्तू स्वीकारल्या जातील, त्या किंमत न बघता खरेदी केल्या जायच्या कारण त्या निजामाला आवडायच्या.
advertisement
हॅरिएट रॉन्केन लिंटन (Harriet Ronken Lynton) आणि मोहिनी राजन यांनी लिहिलेल्या 'डेज ऑफ द बिलव्ह्ड' या पुस्तकातील माहितीनुसार, निजामाच्या सेवकाला त्याची विलासी सवय लक्षात आली. म्हणून त्याने टाकून दिलेले मोजे जमा करण्यास सुरुवात केली. जेव्हा त्याच्याकडे पुरेसे मोजे जमा झाले तेव्हा त्याने ते विकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा आकार लहान असल्याने ते बाजारात विकले जात नव्हते. यातून मार्ग काढण्यासाठी त्या सेवकाने सॉक्स ड्राय-क्लीन केले आणि त्यांना पुन्हा नवीन लेबल लावले. गंमत म्हणजे त्या सेवकाने काही मोजे पुन्हा निजामालाच विकले. निजामाच्या फ्रेंच फॅशनवरील प्रेमामुळे हा सेवक कोट्यधीश झाला होता.
advertisement
वयाच्या दुसऱ्या वर्षी मिळालं होतं निजामपद
हैदराबादचे सहावे निजाम असलेले मीर मेहबूब अली खान जेव्हा गादीवर बसले तेव्हा त्यांचं वय फक्त दोन वर्षे 7 महिन्यांचं होतं. वडिलांच्या मृत्यूनंतर, 5 फेब्रुवारी 1869 रोजी त्यांना आसफ जाही घराण्याचा सहावा निजाम बनवण्यात आलं होतं. निजाम लहान असल्याने संस्थानाचे कामकाज हाताळण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक रिजन्सी कौन्सिल स्थापन केलं होतं. मेहबूब अली 18 वर्षांचे झाल्यावर त्यांच्याकडे राज्याचं कामकाज सोपवण्यात आलं. ब्रिटिश सरकारचा व्हाईसरॉय लॉर्ड रिपन स्वतः हैदराबादला राज्याभिषेकासाठी गेला होता. मीर मेहबूब अली खान हे 1911 पर्यंत हैदराबादचे शासक होते.
Location :
Delhi
First Published :
December 16, 2024 10:44 AM IST