सामान्यपणे आरोग्याची कोणतीही समस्या असेल तर गुगलवर शोधून उपचार करण्याऐवजी डॉक्टरांकडे जावं असं सांगितलं जातं. पण एका महिलेला डॉक्टरांनीच तिच्या आजाराबाबत गुगलवर शोधायला सांगितलं. बियान्का असं या महिलेचं नाव, ब्रिटनमध्ये राहणारी 20 वर्षांची बियान्का, तिला एक रहस्यमयी आजार झाला. तिला सतत लघवीला होत होती. शारीरिक संबंध ठेवताना असह्य वेदना होत होत्या. ती डॉक्टरांकडे गेली.
advertisement
वैद्यकीय तपासात काय समोर आलं?
बियांकानं सांगितलं की, सप्टेंबर 2021 मध्ये ती एका डॉक्टरला भेटली, त्यांनी तिच्या लघवीची चाचणी केली आणि तिला यूटीआयचा त्रास आहे, असं सांगितलं. त्यानुसार तिला औषधं दिलं, अँटीबायोटिक्सचा कोर्स दिला. तिनं तो कोर्सही पूर्ण केला, पण तरी तिचा त्रास काही संपला नाही. ती पुन्हा डॉक्टरांकडे गेली असता डॉक्टरांनी तिला लघवीची दुसरी टेस्ट करायला सांगितलं. तेव्हा तिला कोणताही आजार नसल्याचं डॉक्टर म्हणाले. त्यामुळे तिच्यावर सुरू असलेला उपचार बंद करण्यात आले.
केक-आईस्क्रिम खाताय सावधान! होऊ शकतो मृत्यू? डॉक्टरांनीच सांगितले गंभीर दुष्परिणाम
बियांका पुढची दोन वर्षे त्याच वेदना आणि अस्वस्थतेसह जगत राहिली. शेवटी तिनं सतत लघवीला जावं लागतं, लघवी करताना जळजळ होते, म्हणून पाणी पिणं कमी केलं. त्यानंतर ती पुन्हा डॉक्टरांकडे केली. पुन्हा तिची युरिन टेस्ट झाली. यावेळी तिला वारंवार युरिन इन्फ्केशन होत असल्याचं दिसून आलं. अँडोमेट्रिओसिसची ही सुरुवातीची लक्षण होती. ही अशी स्थिती आहे, ज्यामुळे मासिक पाळीच्या वेळी, लघवीला गेल्यावर आणि लैंगिक संबंध ठेवताना ओटीपोटात तीव्र वेदना होता.
युरोलॉजिस्टकडून उपचार
बियान्कानं सांगितलं की, डॉक्टरांना माझ्या किडनीत प्रोटिनची पातळी जास्त दिसली. त्यांनी ताबडतोब मला तज्ज्ञ डॉक्टरांना भेटायला सांगितलं. नोव्हेंबर 2023 मध्ये ती लंडनच्या रोहॅम्प्टनमधील क्वीन मेरी हॉस्पिटलमधील युरोलॉजिस्टला भेटली. त्यांनी तिला क्रॅनबेरीचा रस आणि पाणी भरपूर प्यायला सांगितलं, पण त्याचाही फायदा झाला नाही.
डॉक्टर म्हणाले, गुगलवर शोधा
आता या वर्षी फेब्रुवारीमध्ये ती पुन्हा एकदा एका महिला डॉक्टरला भेटली, जिथं तिने तिच्या सर्व समस्या सांगितल्या, डॉक्टरांना काही प्रश्न विचारले. त्या डॉक्टरांनी तिला गुगलवर उपचार शोधायला सांगितले. तेव्हा तिला रडूच कोसळलं.
कसं शक्य आहे? 8 वेळा मृत्यू होऊन पुन्हा जिवंत झाली; चमत्कार पाहून डॉक्टरही आश्चर्यचकीत
मिररच्या रिपोर्टनुसार, गेल्या तीन वर्षांपासून ती या विचित्र आजाराचा सामना करत आहे. बियान्का म्हणते की, आजपर्यंत असा एकही डॉक्टर सापडला नाही, जो तिला वेदनादायक समस्येपासून मुक्त करू शकेल. अजूनही ती आपल्या विचित्र आजारावर उपचार शोधत आहे.