केक-आईस्क्रिम खाताय सावधान! होऊ शकतो मृत्यू? डॉक्टरांनीच सांगितले गंभीर दुष्परिणाम

Last Updated:

केक खाल्ल्यानंतर एका 10 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वीच घडली. यानंतर एकच खळबळ उडाली आणि खरंच असं होऊ शकतं का? असा प्रश्न अनेकांना पडला.

केक, आईस्क्रिममुळे जाऊ शकतो जीव?
केक, आईस्क्रिममुळे जाऊ शकतो जीव?
मुंबई : केक, आईस्क्रिम म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. बर्थडे असो वा कोणती पार्टी कोणतंच सेलिब्रेशन केकशिवाय पूर्ण होत नाही आणि आईस्क्रिम म्हणजे आता उन्हाळ्यात तर हवीहवीशीच. पण हे दोन्ही पदार्थ तुमच्यासाठी घातक ठरू शकतात हे तुम्हाला माहिती आहे का? काही दिवसांपूर्वीच पटियालामध्ये केक खाल्ल्याने एका 10 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. केक आणि आईस्क्रिन खाण्याचे दुष्परिणाम काय आहेत हे डॉक्टरांनीच सांगितलं आहे.
केक खाल्ल्याने पटियालामध्ये एका 10 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच ही घटना. तिनं जो केक खाल्ला त्याची आणि ज्या बेकरीतून हा केक मागवण्यात आला तिथल्या इतर केकची तपासणी करण्यात आली. बेकरीच्या त्या केकमध्ये अतिरिक्त आर्टिफिशिअल स्वीटनर सॅकरिन असल्याचं आढळून आलं. त्यामुळे केक, आईस्क्रिम अशा पदार्थांमधील आर्टिफिशिअल स्वीटनर मृत्यूचं कारण ठरू शकतात का? याबाबत मॅक्स हेल्थकेअरचे  एन्डोक्राइनोलॉजिस्ट डॉ. अंबरिश मित्तल यांनी माहिती दिली आहे.
advertisement
कशाकशात असतं आर्टिफिशिअल स्वीटनर?
फक्त केक आणि आईस्क्रीमच नाही तर अशा अनेक गोष्टी बाजारात येतात ज्यात गोडपणासाठी सामान्य साखरेऐवजी कृत्रिम गोडवा वापरला जातो.  वास्तविक, कोणत्याही उत्पादनात सामान्य साखरेऐवजी कृत्रिम स्वीटनर अतिशय कमी प्रमाणात मिसळले जाते आणि ते बाहेर उपलब्ध असलेल्या पॅकबंद खाद्यपदार्थांमध्ये किंवा पेयांमध्ये आढळते. याशिवाय मधुमेही लोक साखरेला पर्याय म्हणून कृत्रिम स्वीटनर देखील घेतात.
advertisement
भारतात कोल्ड ड्रिंक, केक, कँडीज, आइस्क्रीम, फ्रोझन डेझर्ट, दही, च्युइंगम इत्यादींमध्ये आर्टिफिशिअल स्वीटनर वापरलं जातं. ॲस्पार्टम, सुक्रॅलोज, निओटेम, आयसोमल्टुलोज, एसेसल्फेम इत्यादी आर्टिफिशिअल स्वीटनर आहेत, ज्यांना भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. पण एफएसएसआयने त्याचं प्रमाणदेखील निश्चित केलं आहे.
advertisement
आर्टिफिशिअल स्वीटनरमुळे मृत्यू होऊ शकतो?
डॉ मित्तल म्हणाले, काही कृत्रिम गोड पदार्थ 24 तासांच्या आत खाल्ले तर त्याचा अचानक आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही. जर एखाद्याने जास्त प्रमाणात सॅकरिनचं सेवन केलं तर पोटात गॅस बनणं, पोट फुगणं, डोकेदुखी, उलट्या होणं इत्यादी तक्रारी असू शकतात, परंतु जर सॅकरिनचा इतका विषारी प्रभाव असेल की एखाद्याचा जीव गमवावा लागेल, तर ते फारच दुर्मिळ आहे. हे अद्याप पाहिले गेलं नाही.
advertisement
याचा अर्थ असा नाही की कृत्रिम स्वीटनर्समुळे होणारे दुष्परिणाम गंभीर नाही म्हणून कितीही प्रमाणात पदार्थांमध्ये घालावे. सरकारचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे आहेत. कोणत्याही व्यक्तीने नियमानुसार मर्यादित प्रमाणानुसारच आर्टिफिशिअल स्वीटनर वापरावं.
कोणतंही कृत्रिम स्वीटनर रक्तातील ग्लुकोजच्या पातळीला चालना देत नाही. तुम्ही कृत्रिम स्वीटनर्स असलेला कोणताही पदार्थ खाल्ला तर तुमच्या शरीरातील साखरेचं प्रमाण अचानक वाढेल असं नाही. बऱ्याच अभ्यासांमध्ये असं दिसून आलं आहे की कृत्रिम स्वीटनर शरीरात दीर्घकाळ इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता किंचित वाढवते. पण जर कोणी जास्त काळ नियमितपणे मोठ्या प्रमाणात सॅकरिनचे सेवन करत असेल तर त्याचा काही परिणाम होऊ शकतो, पण तसं होत नाही कारण कोणीही तितक्या प्रमाणात ते खाऊ शकत नाही, असं डॉ. मित्तल म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/Viral/
केक-आईस्क्रिम खाताय सावधान! होऊ शकतो मृत्यू? डॉक्टरांनीच सांगितले गंभीर दुष्परिणाम
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement