ही प्लेट सरकारी मान्यतेने दिली जाते आणि वाहन सुरक्षेसाठी आवश्यक आहे. पण अनेकांना HSRP म्हणजे काय? हेच माहित नाही, ते का गरजेचं आहे आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात हे देखील माहित नाही. अशा लोकांसाठी ही कामाची बातमी आहे.
HSRP म्हणजे काय?
HSRP म्हणजे High Security Registration Plate. ही एक विशेष प्रकारची नंबर प्लेट असते, जी चोरी किंवा बनावट नंबर प्लेट टाळण्यासाठी उपयुक्त आहे. यात क्रोमियम बेस्ड होलोग्राम, लेझर कोड आणि पर्मनंट रिव्हेट्स असतात. या प्लेटमुळे वाहन ओळख अधिक सुरक्षित आणि विश्वसनीय बनते.
advertisement
कोणती कागदपत्रं लागतात?
कोणतंही सरकारी काम करण्यासाठी कागदपत्र लागतात, तसंच HSRP नंबर प्लेटसाठी देखील कागदपत्रांची गरज भासते, ते कोणते हे जाणून घ्या
RC Book (नोंदणी प्रमाणपत्र)- हे प्रमाणपत्र मूळ किंवा सॉफ्ट कॉपी चालते. गाडीचा नंबर आणि मॉडेलची माहिती
आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र (काही राज्यात आवश्यक असेल तर), मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी OTP आणि वेळापत्रकासाठी हे गरजेचं असतं.
वाहनाची जुनी नंबर प्लेट (काही प्रकरणांत जमा करावी लागते)
अर्ज कसा कराल?
www.bookmyhsrp.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करा.
आपलं राज्य निवडा, नंतर वाहन क्रमांक आणि तपशील भरा.
स्लॉट निवडून ऑनलाइन पेमेंट करा.
निवडलेल्या तारखेला वाहनासह सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहा.
30 जूननंतर कारवाई होण्याची शक्यता आहे, त्यामुळे विलंब करू नका, नाहीतर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. हे ही वाचा : HSRP नंबर प्लेट नसल्यास किती दंड भरावा लागेल? रस्त्यावर अशी गाडी दिसली तर पोलीस काय कारवाई करतील?
सरकारचे 30 जून ही अंतिम तारिख वाढवण्याबाबत अजून कोणतीही घोषणा केलेली नाही, त्यामुळे सध्यासाठी हीच तारीख अंतिम तारीख मानावी.