TRENDING:

Airplane Fact : किती असते Pilot ची सॅलरी? फक्त रक्कम नाही त्याचे धोके ही समजून घ्या

Last Updated:

हे मोठं जबाबदारीचं देखील काम असतं. त्यामुळे पायलट बनण्यासाठी केवळ शिक्षणच नव्हे, तर कठोर प्रशिक्षण, मानसिक ताकद आणि अनुभवाचीही गरज असते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : विमान चालवणं ही केवळ आकर्षक नोकरी नसून अत्यंत जबाबदारीची आणि कौशल्यांचं काम आहे. इथे एक चुक करण्याचीही परवानगी पायलटला नसते. कारण त्यांची एक चुक शेकडो प्रवाशांवर भारी पडू शकते. त्यामुळे हे मोठं जबाबदारीचं देखील काम असतं. त्यामुळे पायलट बनण्यासाठी केवळ शिक्षणच नव्हे, तर कठोर प्रशिक्षण, मानसिक ताकद आणि अनुभवाचीही गरज असते.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

अलीकडेच एअर इंडियाच्या ड्रीमलाइनर विमानाला अपघात झाला आणि या घटनेने संपूर्ण जग हादरून गेलं. या विमानाचे कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर हे दोघंही अपघातात मृत्युमुखी पडले. त्यांच्यासोबत विमानातील सर्व प्रवाशांनीही आपले प्राण गमावले. त्यामुळे ही घटना भारतीयांसाठी कधीही न विसरणारी आहे.

पण याच सगळ्या पाश्वभूमीवर लोक सोशल मीडियावर विमान, पायलट, विमानप्रवास इत्यादी गोष्टी सर्च करु लागले आहेत आणि त्याची उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यापैकीच एक असा प्रश्न जो लोकांनी वारंवार सर्च केला, तो म्हणजे पायलटला किती पगार मिळतो?

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियासारख्या मोठ्या एअरलाइनमध्ये बोईंग 787 सारखं मोठं विमान उडवणाऱ्या पायलटला महिन्याला सुमारे ₹8 लाख ते ₹10 लाख पगार मिळतो. पण हा पगार अनेक गोष्टींवर अवलंबून असतो जसं की त्याचा अनुभव, फ्लाइंग अवर्स, रँक (कॅप्टन की फर्स्ट ऑफिसर) आणि तो देशांतर्गत की आंतरराष्ट्रीय विमान उडवतोय यावर.

पगाराशिवाय कोणते फायदे मिळतात?

advertisement

पायलटच्या पगारासोबतच त्यांना विविध भत्ते आणि सुविधा मिळतात: ओव्हरटाइमसाठी अतिरिक्त पैसे, रात्रीचं विमान उडवण्याचाा वेगळा भत्ता, परदेशात थांबण्यासाठी वेगळेपैसे, एलटीए (Leave Travel Allowance), मेडिकल आणि विमा सुविधा, सुट्टीच्या दिवशी काम केल्यावर अतिरिक्त पैसे

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

पायलट बनणं हे जितकं ग्लॅमरस दिसतं, तितकंच ते धोकादायकही असतं. त्यांच्या मेहनतीला आणि समर्पणाला योग्य तो सन्मान देणं गरजेचं आहे. Air India च्या ड्रीमलाइनर दुर्घटनेतील पायलट्स आणि प्रवाशांच्या दुःखद मृत्यूनं हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे की, आकाशात उड्डाण करणं हे खरंच किती जोखमीचं असू शकतं? हे यामुळे समोर आलं.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Airplane Fact : किती असते Pilot ची सॅलरी? फक्त रक्कम नाही त्याचे धोके ही समजून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल