या बटणांना फार कमी लोक वापराता, त्यामुळे सहाजिकच फार कमी लोकांना त्याचा नेमका उपयोग काय हे माहीत असतं. या बटणांना फंक्शन कीज (Function Keys) म्हटले जाते आणि त्या प्रत्येकाची विशिष्ट कामगिरी असते. चला तर मग, त्यांचा उपयोग जाणून घेऊया.
F1
कोणतेही सॉफ्टवेअर वापरत असताना Help Menu उघडण्यासाठी वापरले जाते. हे बटण मदतीसाठी आहे.
advertisement
F2
कोणत्याही फाईल किंवा फोल्डरचं नाव Rename करण्यासाठी वापरले जाते.
F3
File Explorer किंवा ब्राउझरमध्ये Search (शोधा) फंक्शन सुरू करण्यासाठी.
F4
Alt कीसोबत वापरल्यास सध्याचं विंडो बंद करतं. (Alt + F4)
F5
वेबपेज किंवा फोल्डर Refresh (ताजं करणे) करण्यासाठी.
F6
वेब ब्राउझरमध्ये URL Bar वर थेट नेण्यासाठी.
F7
MS Word सारख्या सॉफ्टवेअरमध्ये Grammar/Spell Check साठी.
F8
काही संगणकांमध्ये Boot Menu उघडण्यासाठी वापरलं जातं.
F9
Outlook मध्ये ईमेल Send/Receive करण्यासाठी. काही सॉफ्टवेअरमध्ये Refresh साठी.
F10
Menu Bar वर फोकस आणतो. Shift + F10 हे Right Click सारखं कार्य करतं.
F11
Web Browserमध्ये Full Screen Mode ऑन/ऑफ करण्यासाठी.
F12
MS Word मध्ये थेट Save As विंडो उघडण्यासाठी.
F1 ते F12 या बटणांचा योग्य वापर केल्यास तुमचं संगणक काम जलद, स्मार्ट आणि अधिक प्रभावी होऊ शकतं. ही कीज केवळ बटणं नाहीत, तर शॉर्टकट्स आहेत वेळ आणि मेहनत वाचवणारे.
