TRENDING:

चोराचा असा फसला फ्लॅन, सोन्याची चैन ओढणार इतक्यात....CCTV Video

Last Updated:

चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे चोरांचं धाडस वाढलं असून ते सर्रास चोरी करताना आढळून येतात. चोरीच्या घटनांचे अनेक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर येत असतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे चोरांचं धाडस वाढलं असून ते सर्रास चोरी करताना आढळून येतात. चोरीच्या घटनांचे अनेक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर येत असतात. अशाच आणखी एका चोरीच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये चोर सोन्याच्या दुकानात घुसून चोरी करतो मात्र त्याचा प्लॅन फ्लॉप होतो आणि तो पकडला जातो.
चोराचा असा फसला फ्लॅन
चोराचा असा फसला फ्लॅन
advertisement

सोन्याची चोरी करण्याची चोरांची वेगवेगळी टेक्निक तुम्ही पाहिलीच असेल मात्र भर गर्दीत सेक्युरिटी असताना चोरानं दुकानदारासमोरच चोरी केली. आणि ग्राहकांनी त्या चोराला पकडलं. या चोरीच्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

तरुणाच्या पोटात निघाले 39 नाणी आणि 37 चुंबक, पाहून डॉक्टरही हैराण!

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सोन्याच्या दुकानात काही ग्राहक सोन्याची चैन खरेदी करत आहेत. तेवढ्यात एक चोर तोंडाला बांधून येतो आणि सोन्याच्या चैनमधील एक चैन उचलतो आणि पळायला लागतो मात्र ग्राहक त्याला लगेच पकडतात मग सर्वच दुकानातील लोक धावत येतात आणि त्याला पकडतात. चोराचा चोरीचा धाव फसतो आणि तोच अडकतो.

advertisement

@Diwakar_singh31 नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून 49 सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलीच खळबळ माजवत आहे. व्हिडीओ व्हायरल होताच व्हिडीओवर अनेक कमेंटही पहायला मिळत आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

दरम्यान, व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील असल्याचं सांगत आहे. अशा चोरीच्या घटना सतत समोर येत असतात. त्यामुळे लोकांनी घरात असल्यावर आणि घराच्या बाहेरही सतर्क राहण्याची गरज आहे. कारण कधी आणि कशी चोरी होईल सांगता येत नाही.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
चोराचा असा फसला फ्लॅन, सोन्याची चैन ओढणार इतक्यात....CCTV Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल