प्रत्यक्षात पाच पांडवांपैकी सर्वात आधी लग्न झालं ते भीमाचं आणि ज्याच्याशी त्यानं विवाह केला ती होती एका राक्षसी कुलातील कन्या हिडिंबा. ही गोष्ट त्या वेळेची आहे, जेव्हा पांडव लाक्षागृहातून (लाखाचं महाल) बचाव करून वनात भटकत होते. रात्री विसाव्यासाठी ते एका जंगलात थांबले. पण ते जंगल होतं राक्षस हिडिंबचं राज्य. त्याची एक सुंदर बहीण होती हिडिंबा, जिला भीम पाहताच क्षणी आवडला आणि ती त्याच्या प्रेमात पडली.
advertisement
हिडिंबनं आपल्या बहिणीला पांडवांना मारण्याचा आदेश दिला, पण तिनं ते नाकारलं. उलट तिनं भीमाला सगळं सांगितलं आणि आपलं प्रेम व्यक्त केलं. ही गोष्ट कळल्यानंतर भीमनं आपल्या शक्तीने हिडिंबचा वध केला आणि त्यानंतर हिडिंबाशी विवाह केला.
त्या दोघांच्या मिलनातून जन्म झाला एका पराक्रमी पुत्राचा घटोत्कचाचा. तो अर्धमानव आणि अर्धराक्षस होता, पण त्याची निष्ठा आणि शौर्य विलक्षण होतं. महाभारताच्या युद्धात घटोत्कचानं पांडवांच्या बाजूने धैर्याने लढा दिला. शेवटी कर्णाच्या हातून त्याला वीरगती मिळाली. कर्णानं त्यावेळी आपलं सर्वात शक्तिशाली अस्त्र शक्तिबाण घटोत्कचावर वापरलं आणि त्यामुळे अर्जुनचे प्राण वाचले.
भीम-हिडिंबा आणि घटोत्कचाची ही कथा आजही महाभारतातील एक रोमांचक आणि भावनिक अध्याय मानली जाते.
