पण ही अशी गोष्ट खऱ्या आयुष्यात घडली आहे बिहार इलेक्शनमध्ये. या महिला नेताचं नाव आहे. पुष्पम प्रिया चौधरी.. “मी हा मास्क तेव्हाच काढेन, जेव्हा मी निवडणूक जिंकून दाखवेन.” असं पुष्पम प्रिया चौधरी यांनी सांगितलं मात्र 2025 च्या निवडणुकीच्या निकाल पाहता, तो दिवस किंवा क्षण अजून दूर आहे.
दारभंगामध्ये खूपच मागे : काय सांगतात आकडे?
advertisement
दारभंगा विधानसभा सीटवर मतमोजणी सुरू आहे आणि या जागेवर मागील निवडणुकीत विजय मिळवलेल्या बीजेपीचे संजय सरावगी पुन्हा आघाडीवर आहेत. त्यांच्यामागे Vikassheel Insaan Party (VIP) चे उमेश साहनी आहेत ते देखील तब्बल 24 हजार मतांनी मागे. पण सर्वात आश्चर्यजनक म्हणजे, स्वतःला “बिहारसाठी नवा पर्याय” म्हणून सादर करणाऱ्या पुष्पम प्रिया चौधरी यांना 95,529 मतांनी मोठी पिछाडी आणि त्या ही निवडणूक हारले आहेत.
तरीही त्या आपल्या ‘प्लुरल्स पार्टी’च्या ‘शिट्टी’ या चिन्हासह राज्यातील सर्व 243 जागांवर उमेदवार उभे करून आपली राजकीय लढाई चालू ठेवत आहेत.
मास्कची सुरुवात कशी झाली?
त्यांच्याकडे अनेकदा विचारलं जातं “तुम्ही कायम चेहरा का झाकून ठेवता?” पुष्पम यांचं उत्तरही तेवढंच धाडसी होतं, त्या म्हणाल्या
“माझा चेहरा तेव्हा उघडेल, जेव्हा बिहार माझ्या स्वच्छ आणि नव्या राजकारणाला स्वीकारेल.” त्यांच्या मते, मास्क हे भ्रष्टाचार, जातीय राजकारण आणि जुन्या पद्धतींविरुद्धचं प्रतीक आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचाराचा संपूर्ण थीम काळे कपडे, काळा मास्क आणि क्लीन पॉलिटिक्स आहे.
पुष्पम प्रिया चौधरी कोण आहेत? (एका वेगळ्या राजकीय प्रवासाची गोष्ट)
बिहारच्या पारंपरिक राजकारणात तरुण चेहरे तितकेसे दिसत नाहीत. पण पुष्पम प्रिया मात्र पूर्ण वेगळी कथा घेऊन आल्या.
जन्म: 13 जून 1987, दारभंगा
शाळा: दारभंगामध्येच
ग्रॅज्युएशन: पुण्यामध्ये
पुढचं उच्च शिक्षण: University of Sussex - Development Studies (Master’s)
London School of Economics (LSE) - Public Administration (2019)
राजकारणात थेट उडी घेण्यापूर्वी त्यांनी बिहार सरकारच्या पर्यटन विभागात सरकारी नोकरीतही कामाचा अनुभव घेतला. यामुळे त्यांना प्रशासन, योजनांची अंमलबजावणी आणि जमिनीवरील कामाचा जवळून अनुभव मिळाला.
पुष्पम प्रिया राजकारणात नवीन नाहीत, कारण त्यांचे वडील विनोद कुमार चौधरी - JDU चे माजी आमदार (दारभंगा). त्यांचे आजोबा प्रो. उमाकांत चौधरी - मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे विश्वासू, सामता पक्षाचे सुरुवातीचे सदस्य. त्यांचे काका विनय कुमार चौधरी 2020 मध्ये JDU कडून बेनीपूरचे आमदार. म्हणजेच, राजकारण त्यांच्यासाठी नवीन नाही, पण त्यांनी निवडलेला मार्ग मात्र पूर्णपणे वेगळा.
सध्या मतमोजणीचे ट्रेंड त्यांना अनुकूल नसले तरी त्या ज्या पद्धतीने नव्या शैलीत, नव्या राजकीय विचारसरणीने स्वतःला लोकांसमोर ठेवत आहेत आणि संपूर्ण बिहारमध्ये स्वतःच्या पक्षाचे उमेदवार उभे करत आहेत. ते पाहता, बिहारच्या राजकारणात त्यांचं अस्तित्व टिकून आहे, हे नक्की.
त्या ही निवडणूक हारले आहेत. त्यामुळे आता मास्क काढण्याचा त्यांचा दिवस अजून दूर असेल… पण त्या सध्या चर्चेत आहेत हे मात्र नक्की.
