TRENDING:

Desi Jugad : खिडकीमध्ये बहुतांश लोक का लावत आहेत एल्युमिनियम फॉइल? थक्क करणारी कारणं समोर

Last Updated:

अनेकांच्या घराच्या बालकनीमध्ये लोक सिल्वर फॉईल लावताना दिसत आहे. पण हे नेमकं का आणि कशासाठी केलं जातं? असे प्रश्न अनेकांना आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारतात जुगाडू लोकांची कमी नाही. लोक असे एक सौ एक जुगाड करत असतात की काही जुगाड पाहून लोकांना आश्चर्य वाटतं आणि विचार करायला भाग पाडतं. अशाच एक जुगाड लोकांमध्ये व्हायरल होत आहे. अनेकांच्या घराच्या बालकनीमध्ये लोक सिल्वर फॉईल लावताना दिसत आहे. पण हे नेमकं का आणि कशासाठी केलं जातं? असे प्रश्न अनेकांना आहेत.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

थंडीच्या दिवसांत घर गरम ठेवण्यासाठी लोक किती तरी जुगाड करतात. कोणीतरी जाड पडदे लावतो तर कोणीतरी प्लास्टिक शीटने खिडक्या बंद करतो. पण सोशल मीडियावर आता एक अनोखा आणि खूप सोपी ट्रिक व्हायरल झाली आहे, जो दिसायला जरी ‘DIY जुगाड’ सारखा वाटला तरी घरातील थंडी, प्रकाश आणि पक्ष्यांच्या त्रासावर अप्रत्यक्षपणे मोठा प्रभाव टाकतो. लोक आपल्या बाल्कनीत, खिडक्यांवर किंवा झाडांच्या मागे एल्युमिनियम फॉइल लावायला सुरुवात करत आहेत आणि यामागे कारणही तितकंच रोचक आहे.

advertisement

चला तर जाणून घेऊया, नेमकं हे एल्युमिनियम फॉइल बाल्कनीत ठेवल्याने कोणते फायदे मिळतात आणि ही ट्रिक इतका लोकप्रिय का होत आहे.

1. थंड हवेला घरात येण्यापासून रोखते

हिवाळ्यात उठणाऱ्या थंड आणि बोचऱ्या वाऱ्यांमुळे घरातील तापमान झटपट कमी होते. फॉइल खिडकीच्या काचेवर लावल्यास त्या थंड वाऱ्यांचा थेट घरात होणारा प्रवेश काही प्रमाणात कमी होतो. त्यामुळे घर थोडं उबदार राहतं आणि हीटर/ब्लोअरची गरज कमी पडते.

advertisement

2. कमी मिळणारी हिवाळ्यातील सूर्यप्रकाश अधिक पसरतो

थंडीत बहुतेक घरांना कमी सूर्यप्रकाश मिळतो. अशा वेळी एल्युमिनियम फॉइल सूर्याची किरणं परावर्तित करून खोलीत जास्त प्रकाश आणि उबदारपणा पोहोचवते. उन कमी मिळणाऱ्या घरांसाठी हा उपाय खूप उपयोगी ठरतो.

3. विंटर प्लांट्सच्या ग्रोथसाठी फायदेशीर

हिवाळ्यात काही इनडोअर/आउटडोअर प्लांट्सना आवश्यक सूर्यप्रकाश मिळत नाही. अशावेळी हे फॉईल प्लांट स्टँडच्या मागे फॉइल लावल्यास प्रकाश थेट वनस्पतींवर रिफ्लेक्ट होतो. त्यामुळे त्यांची वाढ चांगली होते आणि उबाही मिळते. हा उपाय प्लांट लव्हर्समध्ये विशेष लोकप्रिय होत आहे.

advertisement

4. बाल्कनीत येणाऱ्या कबूतर आणि चिमण्यांना दूर ठेवतो

कबूतरांनी गोंधळ करणे, घाण करणे किंवा घरटी बांधणे ही अनेकांची मोठी समस्या. एल्युमिनियम फॉइलची चमक आणि त्याचा सतत हलण्यामुळे येणारा आवाज कबुतरांसाठी त्रासदायक असतो. वाऱ्याने फॉइल हललं की परावर्तित प्रकाशामुळे पक्षी घाबरून बाल्कनीत येत नाहीत. यासाठी कोणतेही केमिकल लागत नाही. पूर्णपणे नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय.

advertisement

5. कीटकांना दूर ठेवण्यासाठी मदत

फॉइलवर पडणारं उन अनेक कीटकांना, लहान माशांना दूर ठेवते. त्यामुळे बाल्कनीत किंवा खोलीत त्यांची संख्या कमी दिसते. काही लोक छोटे स्ट्रिप्स कापून झाडांच्या आसपास ठेवतात, ज्यामुळे कीटक प्लांट्सजवळ येत नाहीत.

6. ही ट्रिक का व्हायरल झाली?

एल्युमिनियम फॉइलचे फायदे जास्त आणि खर्च कमी. शिवाय हे स्वस्त आहे, सहज मिळणारे आहे, लावायला एकदम सोपं, शिवाय लगेच परिणाम दिसणारे त्यामुळे लोक याचा वापर करत आहेत.

थंडीपासून संरक्षण असो, प्रकाश वाढवणे असो किंवा पक्षी-कीटकांपासून बचाव या सर्व समस्या एकाच स्वस्त उपायाने कमी होऊ शकतात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
एका एकरात केली काकडी लागवड, 60 दिवसांत 1 लाख कमाई,शेतकऱ्याने सांगितला फॉर्म्युला
सर्व पहा

म्हणूनच हा जुगाड इंटरनेटवर वेगाने वायरल होतो आहे.

मराठी बातम्या/Viral/
Desi Jugad : खिडकीमध्ये बहुतांश लोक का लावत आहेत एल्युमिनियम फॉइल? थक्क करणारी कारणं समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल