कर्नाटकच्या बंगळुरूमधील ही घटना आहे. लोकनाथ सप्टेंबर 2023 पासून यशस्विनीच्या कुटुंबावर त्यांचं लग्न मान्य करण्यासाठी दबाव टाकत होता. धमकी देत होता. कुटुंबाच्या विरोधात जाऊन त्यांनी 4 महिन्यांपूर्वी लग्न केलं. पण लग्नानंतर त्याने तिला त्रास द्यायला सुरुवात केली. तिने शारीरिक संबंधाला नकार दिला की तो तिला छळायचा. तिला तिच्या आईला आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवाया तयार कर, असं तिला सांगत होता.
advertisement
शेवटी कंटाळून यशस्विनी त्याला सोडून आपल्या माहेरी निघून गेली. लोकनाथ तिथंही यायचा. ती आपल्यासोबत आली नाही तर चांगलं नाही. अशी धमकी तिच्या कुटुंबाला देत होता. शेवटी यशस्विनी आणि तिच्या आईने त्याच्या हत्येचा कट रचला.
बर्याच दिवसांनी माहेरहून सासरी आली बायको, नवर्याला झाला नाही कंट्रोल, पत्नी रुग्णालयात
यशस्विनीनी लोकनाथला शनिवारी सकाळी भेटायला बोलावलं. सकाळी 10 वाजता कारमधून निघाला. त्याने यशस्विनीला कारमध्ये घेतलं आणि दोघं एका निर्जनस्थळी गेले. यशस्विनी आणि तिच्या आईने घरात काही पदार्थ बनवले ज्यात त्यांनी ड्रग्ज टाकलं. यशस्विनीसोबत पार्टी करायची म्हणून लोकनाथने काही बीअरच्या बाटल्या सोबत घेतल्या होत्या. निर्जन स्थळी कारमध्येच बसून दोघंही बिअर प्यालले. लोकनाथ खूप प्यायला होता. त्याचवेळी यशस्विनीने त्याला ड्रग्ज मिसळलेले पदार्थ खायला दिले आणि आपलं लोकेशन आईसोबत शेअर केलं.
लोकनाथला बेशुद्ध होऊ लागला. तेव्हा त्याची सासू हेमा तिथं आली आणि तिनं त्याच्या गळ्यावर चाकू फिरवला. तिनं चाकूने त्याच्या गळ्यावर दोनदा वार केले. रक्तबंबाळ अवस्थेतच लोकनाथ कारमधून बाहेर पडला. 150 मीटरपर्यंत पळाला. एका पार्क केलेल्या रिक्षात तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लपला. स्थानिकांनी त्याला पाहिलं. त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. चिक्काबनवारा परिसरात एका गाडीत शनिवारी स्थानिकांना एका गाडीत मृतदेह दिसला.
इंजिनीअर तरुण चोरायचा महिलांचे अंडरवेअर, कारण ऐकून पोलीसही अवाक
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार पोलिसांनी सांगितलं की, विवाहबाह्य संबंध आणि बेकायदेशीर बिझनेस हे हत्येचं कारण असावं. लोकनाथची एका फ्रॉड केसमध्ये बंगळुरू सेंट्रल क्राइम ब्रांचकडून चौकशी सुरू होती. पोलिसांनी 19 वर्षांची यशस्विनी सिंह आणि तिची 37 वर्षांची आई हेमा बाई यांना अटक केली आहे.
