इंजिनीअर तरुण चोरायचा महिलांचे अंडरवेअर, कारण ऐकून पोलीसही अवाक
- Published by:Priya Lad
Last Updated:
Engineer Man steal woman undergarment : तरुणाचे आईवडील शिक्षक आहेत आणि त्याचा मोठा भाऊदेखील इंजिनीअर आहे. जेव्हा पोलिसांनी आरोपीच्या घरी पोहोचून त्याच्या या कृत्याबाबत सांगितलं, तेव्हा कुटुंबातील सदस्यांनाही धक्का बसला.
नवी दिल्ली : चोरीच्या बऱ्याच घटनांबाबत तुम्ही ऐकलं असेल. सध्या चोरीचं विचित्र प्रकरण चर्चेत आलं आहे. चक्क एक इंजिनीअर चोर. इंजिनीअरिंग केलेला तरुण जो चोरी करत होता. चोरायचा काय तर महिलांचे अंडरवेअर. महिलांचे अंडरवेअर चोरणाऱ्या या इंजिनीअर चोराला पोलिसांनी पकडलं. त्याला यामागील कारण विचारलं असता ते ऐकून पोलीसही अवाक झाले.
कर्नाटकच्या बंगळुरूमधील तुकरुम इथली ही घटना. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाड्याच्या घरात राहणाऱ्या विद्यार्थिनींचे अंडरगार्मेंट्स गायब होऊ लागले. त्यांनी इमारतीच्या मालकाकडे याची तक्रार केली. इमारत मालकाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता त्यांना धक्काच बसला. कारण एक तरुण महिलांचे अंडरगार्मेंट्स चोरत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलं. त्याने विद्यार्थिनींच्या घराजवळ त्याची दुचाकी थांबवली आणि अंतर्वस्त्र चोरले.
advertisement
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या तरुणाला पकडलं. 25 वर्षांचा हा तरुण इंजिनीअर आहे. शरत असं त्याचं नाव. तुमकुरु येथील एसआयटीच्या आयव्ही क्रॉसचा तो रहिवासी आहे.त्याने शहरातील अनेक ठिकाणी अंतर्वस्त्रे चोरल्याची कबुली दिली आहे. त्याने शहरातील एसआयटी क्षेत्र, एसएस पुरम आणि अशोक नगरमधील घरांमधून महिलांचे अंतर्वस्त्र चोरले होते.
advertisement
शरतचे आईवडील शिक्षक आहेत आणि त्याचा मोठा भाऊदेखील इंजिनीअर आहे. जेव्हा पोलिसांनी आरोपीच्या घरी पोहोचून त्याच्या या कृत्याबाबत सांगितलं, तेव्हा कुटुंबातील सदस्यांनाही धक्का बसला . कुटुंबातील सदस्यांना शरतच्या वागण्याबद्दल माहिती नव्हती.
इतक्या सुशिक्षित कुटुंबातील असूनही शरत असं का करत होता, असा प्रश्न पोलिसांनाही पडला. पोलिसांनी चौकशी केला असता त्याने जे कारण सांगितलं त्यामुळे पोलीसही अवाक झाले. पोलिसांनी सांगितले की त्याला ब्लू फिल्म पाहण्याचं व्यसन होतं. नंतर पोलिसांनी शरतला जामिनावर सोडलं आणि भविष्यात अशा प्रकारचे कृत्य न करण्याचा इशारा दिला.
advertisement
घरातून गायब होत आहेत महिलांचे अंडरविअर, सत्य समजताच नवरे धक्क्यात
राजस्थानतही महिलांच्या अंडरवेअर चोरीचं असं प्रकरण समोर आलं होतं. विजयनगर पोलीस स्टेशन हद्दीतील ही अजब घटना. एक चोर रोज गच्चीवर पोहोचून घरात ठेवलेले महिलांचे अंतर्वस्त्र चोरून फरार व्हायचा. या संदर्भात मंगळवारी विजयनगर टँक गली येथील रहिवाशांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून योग्य कारवाईची मागणी केली
advertisement
परिसरातील लोकांनी या चोराची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो या भागातील नाही. लोक म्हणतात की तो छतावरून घरात प्रवेश करतो. तो सतत महिलांचे कपडे चोरत असतो. या चोराचा हेतू काय आहे हे माहित नाही, पण लोकांच्या मनात भीतीचं वातावरण पसरलं होतं.
advertisement
Location :
Delhi
First Published :
March 28, 2025 11:29 AM IST