पती आणि पत्नी हे नातं आणि बर्थडे विश. यात ट्रोल होण्यासारखं काय आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक लाल रंगाची साडी नेसलेली ही सुंदर महिला आणि टी-शर्ट घालून तिच्या समोर उभा असलेला तिचा नवरा. ज्याचा बर्थ डे आहे.
व्हिडीओच्या सुरुवातीला महिला नवऱ्याच्या टी-शर्टची कॉलर नीट करते. नंतर ती एक पांढरा केक दाखवते ज्यावर 'हॅपी बर्थडे किंग ऑफ माय हार्ट', असं लिहिलेले आहे. त्यानंतर ती त्याला गुलाबांचा गुच्छ देते, ज्यासाठी तो तिला थँक्यू बोलतो, त्याच्या चेहऱ्यावर गोड हसू असतं. नंतर दोघंही एकत्र केक कापतात, एकमेकांना भरवतात आणि नंतर जेवतात.
advertisement
लग्न झाल्यापासून सतत तेच! बायकोची नको ती सवय, 25 दिवसांतच नवऱ्याचा गेला जीव
एकंदर पाहिलं तर एका रेस्टॉरंटमध्ये या कपलने बर्थडे साजरा केल्याचं दिसतं आहे. तसं व्हिडीओ पाहिलं तर त्यात काहीही आक्षेपार्ह दिसत नाही. म्हणजे सामान्यपणे जसं बर्थडे सेलिब्रेशन केलं जातं, तसंच हे करण्यात आलं आहे. त्यात काही वावगं दाखवलं नाही. पण तरी हे कपल ट्रोल झालं आहे? कमेंटमध्ये त्यांच्याबाबत नको नको त्या प्रतिक्रिया येत आहेत.
दृष्टी दिजिका कलिता नावाच्या महिलेच्या @munnadijika इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. "जर तुम्ही खरोखर मनापासून प्रेम करत असाल तर जगातील शक्ती देखील तुम्हाला वेगळे करू शकत नाहीत", असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
नको मला बंगला, गाडी, उंट पाहिजे! नवरदेवाचा हट्ट; पण सासरच्यांनी म्हैस दिली आणि पुढे भयंकर घडलं
पण या कपलच्या वयातील फरक पाहता लोकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. पैशांसाठी हे दोघं एकत्र असल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी अश्लील कमेंटही केल्या आहेत. तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
