TRENDING:

GST मुळे iPhone17 ची किंमत कमी होणार? इलेक्ट्रॉनिकस वस्तूंच्या यादीत Apple आहे का?

Last Updated:

iPhone17 ची वाट पाहाणाऱ्या लोकांच्या मनात ही एक प्रश्न उपस्थीत झाला आहे. तो म्हणजे आता जीएसटी कमी झाल्यावर iPhone17 कमी किंमतीत मिळणार का? किंवा या फोनची किंमत कमी होणार का? आणि होणार असेल तर तो आता GST दर कमी केल्यानंतर कितीला मिळेल?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारतातील जीएसटी प्रणालीमध्ये सरकारने अलीकडेच मोठी सुधारणा केली आहे. आता 22 तारखेपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. जीएसटी काउन्सिलने केवळ 5% आणि 18% याच दोन स्लॅब्समध्ये कर संरचना केली आहे. ज्यामुळे ती आता सोपी होणार असल्याचं घोषित केलं आहे, यामुळे अनेक वस्तूंवरील कर दर आता कमी होण्याची शक्यता आहे.
सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
advertisement

समोर आलेल्या माहितीनुसार TV, AC, Washing Machine, Dish Washer यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दर कमी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण यासगळ्यात iPhone17 ची वाट पाहाणाऱ्या लोकांच्या मनात ही एक प्रश्न उपस्थीत झाला आहे. तो म्हणजे आता जीएसटी कमी झाल्यावर iPhone17 कमी किंमतीत मिळणार का? किंवा या फोनची किंमत कमी होणार का? आणि होणार असेल तर तो आता GST दर कमी केल्यानंतर कितीला मिळेल?

advertisement

आधी आपण iPhone 17 अपेक्षित किंमत, लाँच डेट आणि वैशिष्ट्ये यांबद्दल जाणून घेऊ.

Apple ने 9 सप्टेंबर 2025 रोजी "Awe Dropping" इव्हेंटमध्ये iPhone 17 मालिकेला लाँच करणार असल्याचं सांगितलं आहे.

या सीरिजमध्ये iPhone 17, 17 Pro, Pro Max आणि 17 Air असे चार मॉडेल्स आहेत.

iPhone 17 Air हा सर्वात पातळ (5.5 mm) आणि हलका फोन ठरवला आहे, ज्याची किंमत भारतात अंदाजे ₹1,20,999 असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

advertisement

Pro आणि Pro Max मॉडेल्समध्ये A19 Pro चिप, 48MP ट्रिपल रियर कॅमेरा, 120Hz ProMotion डिस्प्ले, 12GB RAM, आणि सुधारित बॅटरी आणि डिस्प्ले क्षमता असल्याची अपेक्षा केली जात आहे. पण आता याची खरी किंमत आणि नवीन हटके फीचर्स हे iPhone 17 लाँच झाल्यावरच कळेल.

iPhone 17 च्या किंमतीत बदल होणार?

समोर आलेल्या माहितीनुसार या जीएसटी सुधारणांमुळे iPhone 17 च्या किमतीत काही तात्काळ कमी होण्याची अपेक्षा नाही कारण तो अद्याप 18% स्लॅबमध्येच असेल. त्यामुळे जरी कर संरचनेत बदल झाला तरी, iPhone 17 वर लाभ मिळणं किंवा सवलत मिळणं तसं कठीणच आहे. त्यामुळे iPhone 17 ची किंमत कमी होण्याची शक्यता जवळ-जवळ नाहीच.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
GST मुळे iPhone17 ची किंमत कमी होणार? इलेक्ट्रॉनिकस वस्तूंच्या यादीत Apple आहे का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल