प्रकरण इंग्लंडमधील लिंकनशायर येथील आहे. एके दिवशी इथे राहणारी डेबोराह बर्गस नावाची महिला अचानक करोडपती झाली. आश्चर्याची बाब म्हणजे अनेक महिने तिला याची माहिती नव्हती. मात्र, माहिती मिळताच आपली फसवणूक होत असल्याचं तिला वाटलं. पण जेव्हा तिला ती करोडपती झाल्याचं समजलं तेव्हा सुरक्षेसाठी पोलिसांना बोलवावं लागलं.
10 कोटीची लॉटरी -
advertisement
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 56 वर्षीय डेबोराह बर्गसने गेल्या वर्षी ऑगस्ट 2023 मध्ये नॅशनल लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं. पण ती याबद्दल पूर्णपणे विसरली होती आणि तिने त्याबद्दल कधीही चौकशी केली नाही. एके दिवशी जेव्हा तिला ॲनिमियाच्या उपचारासाठी The Spires Hospital मध्ये दाखल करण्यात आलं होतं, तेव्हा ती तिचा मेल तपासत होती. तेव्हाच तिला कळलं की तिने मिलियन पौंड म्हणजेच 10,57,94,000 रुपयांचे बक्षीस जिंकले आहे.
याबद्दल मिररशी बोलताना ती म्हणाली की, सुरुवातीला तिला हा स्कॅम वाटला. त्यानंतर ती इतकी घाबरली की तिने तिच्या आईला याची माहिती दिली आणि तिने पोलिसांना घरी बोलावलं. त्यानंतर त्यांनी नॅशनल लॉटरी ऑपरेटरला फोन केला आणि समजलं की तिने इतकी मोठी लॉटरी जिंकली आहे. याची पुष्टी होताच तिने आपल्या मुलाला याबद्दल सांगितलं आणि ते सर्वजण फिरायला गेले.