ही बातमी वाचल्यानंतर, कदाचित तुम्ही पाणीपुरी खाणेच सोडून द्याल किंवा मोठी पुरी खाण्याची 'डिमांड' नक्कीच करणार नाही. कारण, एका महिलेला मोठी पाणीपुरी तोंडात टाकणं इतके महागात पडले आहे की, तिला स्वतः काही सांगणेही कठीण झाले आहे.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) एका जिल्ह्यात घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. एका मोठ्या पुरीमुळे महिलेचा जबडा जागेवरून सरकला (Dislocated Jaw) आहे आणि तिचे तोंड बंद न होता उघडेच राहिले आहे. नेमका काय आहे हा संपूर्ण प्रकार, ज्यामुळे डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे, चला जाणून घेऊया...
advertisement
जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्याच्या दिबियापूर पोलिस ठाणे परिसरातील गौरी किशनपूर काकोर येथे ही घटना घडली आहे. इंकला देवी (वय अंदाजे ५० वर्षे) नावाच्या या महिला त्यांच्या कुटुंबासोबत औरैया जिल्हा रुग्णालयात (District Hospital) त्यांच्या भाची आणि सुनेच्या डिलिव्हरीसाठी थांबल्या होत्या.
सकाळी मुलांना पाणीपुरी खाण्याची इच्छा झाली, म्हणून संपूर्ण कुटुंब जवळच्या ठेल्यावर पोहोचले.
इथेच तो भयानक प्रकार घडला. इंकला देवी यांनी एक मोठा गोलगप्पा खाण्यासाठी तोंड उघडले, पण तोंड उघडल्यानंतर ते बंदच झाले नाही. गोलगप्पा अर्धा आत आणि अर्धा बाहेर अडकला आणि त्याच क्षणी त्यांचा जबडा लॉक झाला. त्यांनी तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते शक्य झालं नाही. या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.
पीडित महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले की, "हे सगळं इतक्या झटक्यात घडलं की, आम्हाला वाटले ती मस्करी करत आहे. पण नंतर त्या रडू लागल्या आणि तोंड बंद करता येत नव्हते. आम्ही धावत त्यांना पुन्हा रुग्णालयात घेऊन गेलो."
काय म्हणाले जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर?
जिल्हा रुग्णालयात ड्युटीवर असलेले डॉ. मनोज कुमार यांनी सांगितले की, "महिलेचा जबडा पूर्णपणे सरकला होता (Jaw Dislocated). आम्ही हाताने तो जागेवर बसवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यांना पुढील उपचारांसाठी सैफई मेडिकल कॉलेजमध्ये (Saifai Medical College) संदर्भित (Refer) करण्यात आले आहे. माझ्या आयुष्यात मी असा केस पहिल्यांदाच पाहिला."
या घटनेनंतर डॉक्टरांनी खास करून अशा लोकांसाठी सल्ला दिला आहे, ज्यांच्या जबड्यांमध्ये वेदना (Jaw Pain) होतात किंवा तोंड पूर्ण उघडायला त्रास होतो. डॉक्टरांनी सांगितले की, अशा लोकांनी जोर जबरदस्तीने तोंड उघडण्याचा प्रयत्न करू नये. जेवणाचे मोठे घास किंवा पाणीपुरी पदार्थ एकदम तोंडात टाकू नयेत. त्यामुळे इंकला देवीसोबत घडलेल्या या घटनेसारख्या समस्या टाळता येतील.
या अचानक घडलेल्या घटनेमुळे इंकला देवीचे कुटुंबीय धक्का आणि भीतीच्या (Fear) अवस्थेत आहेत. इंकला देवी अजूनही तोंड बंद करू शकत नसून त्यांना सतत वेदना जाणवत आहेत. डॉक्टरांच्या मते, जास्त वेगाने तोंड उघडल्यास किंवा एकदम मोठा घास घेतल्यास जबडा सरकण्याची शक्यता असते. सध्या महिलेवर सैफई मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत, जिथे प्रगत वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत.
