हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर Obiyon Meche नावाच्या युजरने शेअर केला आहे आणि हे अजिबातही स्वादिष्ट नसलेलं अन्न म्हटलं आहे. उंदरापासून ही डिश तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओमध्ये दाखवली आहे. युजरने लिहिलं आहे, की हे खाद्य व्हिएतनाममध्ये मिळू शकतं, ज्याची किंमत सुमारे 160 रुपये प्रति किलो आहे. उंदरांना मारल्यानंतर त्यांची सफाई केली जात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर पॉलिथिनच्या साहाय्याने त्यावर तांदूळ गुंडाळला जातो.
advertisement
यानंतर उंदीर तळण्यासाठी पॅनमध्ये ठेवला जातो. तो तपकिरी झाल्यानंतर त्याला पॅनमधून बाहेर काढलं जातं आणि प्लेटमध्ये सर्व्ह केलं जातं. बहुतेक लोकांना हे अन्न आवडत नाही, परंतु असे बरेच लोक आहेत ज्यांच्यासाठी हे त्यांचं आवडतं अन्न आहे. या लोकांचा असा विश्वास आहे की उंदरांपासून शरीराला भरपूर प्रथिने मिळतात. हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी लाईक केला आहे.
इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर होताच तो व्हायरल झाला. शेकडो लोकांनी कमेंट केल्या. एका यूजरने याला पाप म्हटलं आणि हे घृणास्पद असल्याचं लिहिलं. तर दुसऱ्या यूजरने लिहिलं आहे की, जर प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर हे खाऊ शकतो, परंतु उंदराच्या त्वचेवर असलेले केस किंवा फर काढून टाकावे लागतील. दुसऱ्याने लिहिलं की मेक्सिकोच्या जाकाटेकासमध्ये लोक उंदीर सूप बनवतात.