व्हर्जिनियाची रहिवासी असलेली टिएरा बार्ली खूप भाग्यवान ठरली. नशिबाने तिला लखपती तर बनवलंच पण ती हे पैसे गमावणार असतानाही नशिबाने साथ दिली आणि ती वाचली. Tierra Barley ने सुपरमार्केटमधून लॉटरीचं तिकीट विकत घेतलं. बिस्किटांवर लिहिलेले आकडे लकी नंबर मानून तिने त्याच नंबरचं तिकीट घेतलं. 8 मे रोजी सोडत काढण्यात आली तेव्हा, पाच पैकी चार क्रमांक टिएरा बार्लीच्या क्रमांकाशी जुळले. यामुळे, तिला $50,000 म्हणजेच अंदाजे 41 लाख रुपयांचा जॅकपॉट मिळाला. हे पाहून तिने आनंदाने उडी मारली.
advertisement
आता मृत्यूनंतर माणसाला पुन्हा जिवंत करता येणार? प्रयोगासाठी कंपनीने केला लाखोंचा खर्च, अन् अखेर...
आनंद साजरा करत असतानाच तिच्या डोक्यात आलं, की आपलं तिकीट कुठं आहे? त्याचा शोध सुरू केला असता ते सापडलं नाही. ती निराश झाली. नंतर तिच्या लक्षात आलं की तिकीट खरेदी केल्यानंतर तिने ते दुकानातच सोडलं होतं आणि ती आपल्या मुलीसह पार्कमध्ये गेली होती. सुदैवाने, जेव्हा ती दुकानात परत गेली तेव्हा जिंकलेलं तिकीट तिला परत केलं गेलं. यानंतर तिला खरा आनंद झाला.
व्हर्जिनिया लॉटरीने गुरुवारी सांगितलं की बार्लीचे 8 मेच्या ड्रॉमध्ये पाच भाग्यवान क्रमांकांपैकी चार जुळले. जर एखाद्याचे सर्व 6 क्रमांक जुळले तर त्याला मेगा जॅकपॉट मिळेल. मात्र, हे 292.2 दशलक्षांमध्ये एकदाच घडतं. लॉटरीमधून गोळा केलेला सर्व निधी ओल्ड डोमिनियनमधील शिक्षणासाठी जातो.