फिल्म थिएटरमध्ये आपण सामान्यपणे फिल्म पाहायला जातो. पण थिएटरमध्ये फिल्म पाहायला आलेली ही तरुणी असं काही करताना दिसली, हे लोकांनी संताप व्यक्त केला आहे. याच थिएटरमध्ये फिल्म पाहायला आलेल्या एका प्रेक्षकाने या तरुणीचा फोटो काढला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्यावर चर्चा होते आहे.
काय सांगता! गॅस भरायला आले आणि मिळाले 1,57,82,64,10,400 रुपये, कसं काय?
advertisement
फोटोत तुम्ही पाहू शकता. फिल्म थिएटरमध्ये एका सीटवर बसलेली ही तरुणी. जिच्या मागच्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकाने तिचा हा फोटो काढला आहे. तिच्या मांडीवर लॅपटॉप दिसतो आहे. व्यक्तीने पोस्टमध्ये सांगितल्यानुसार ही तरुणी फिल्म थिएटरमध्ये बसून ऑफिसचं काम करत होती.
पोस्टमध्ये म्हटलं आहे की, हे फक्त बंगळुरूतच. लोका मुव्ही पाहायला गेलो आणि पुढच्या रांगेत बसलेल्या महिलेने तिचा लॅपटॉप उघडला आणि ऑफिसमध्ये काम करत अस्लयासारखं ती काम करू लागली, थिएटरमध्ये टायपिंग करू लागली. लोक 2 तासही ऑफिसच्या कामाच्या प्रेशरमधून निवांत राहू शकत नाही. हे काय आहे?
Woman working on Laptop in Theater! Blore work culture is wild!
पाहता पाहता हा फोटो खूप व्हायरल झाला. ज्यावर खूप कमेंट आल्या आहेत. कुणी या तरुणीला ट्रोल केलं आहे तर कुणी कंपनीला. टॉक्सिक वर्क कल्चरबाबत सगळ्यांनी संताप व्यक्त केला आहे. सिनेमा हा आनंद घेण्यासाठी आहे. जर तिथं बसूनही काम करायचं असेल तर एकतर कंपनी अत्यंत टॉक्सिक आहे किंवा कर्मचारी न कळवता फिल्म पाहायला आला आहे. ज्यामुळे तिला इथंही काम करावं लागत आहे, अशी कमेंट एका युझरने केली आहे.