अमेरिकेतील ही घटना चर्चेत आली आहे. टेनेसीमधील नॅशव्हिल येथील एका महिलेने एका बाळाला जन्म दिला ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शेल्बी मार्टिन नावाची ही महिला जी प्रसूतीसाठी ट्रायस्टार सेंटेनियल वुमेन रुग्णालयात आली होती. ही प्रसूती सी-सेक्शनद्वारे करण्यात आली आणि ती यशस्वी झाली. पण बाळाला पाहून डॉक्टारांना आश्चर्य वाटलं.
OMG! गर्भातील बाळाने आपल्याच भावंडांना 'खाल्लं', सोनोग्राफी रिपोर्ट पाहून डॉक्टरही धक्क्यात
advertisement
बाळाचं नाव कॅसियन ज्याचं वजन सरासरी अमेरिकन नवजात बाळाच्या जवळजवळ दुप्पट होतं, जे साधारणपणे 7 पौंड असतं. कॅसियन 12 पौंड 14 औंस म्हणजे तब्बल 5.8 किलोग्रॅमचा. डॉक्टर आणि नर्सच्या गेल्या तीन वर्षांच्या इतिहासातील हे सर्वात वजनदार बाळ आहे.
डॉक्टरांच्या मते, 4.5 किलोपेक्षा जास्त वजनाच्या बाळाला मॅक्रोसोमिक किंवा जम्बो बेबी म्हणतात. हे अनुवंशशास्त्र, आईचं आरोग्य, प्रेग्नन्सीचा कालावधी आणि प्रेग्नन्सीतील डायबेटिज यासारख्या घटकांमुळे असू शकते. जरी बहुतेक मोठी बाळं पूर्णपणे निरोगी जन्माला येतात, तरी प्रसूतीदरम्यान गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो. म्हणूनच अशा प्रकरणांमध्ये सी-सेक्शन हा बहुतेकदा सुरक्षित पर्याय मानला जातो.
Pregnancy News : प्रेग्नंट महिलेचा मृत्यू, डॉक्टरांनी तसाच ठेवला मृतदेह, पुढे जे घडलं ते...
या प्रकरणा आई आणि बाळ दोघंही पूर्णपणे निरोगी आहेत. जन्मानंतर बाळाला काही काळासाठी नवजात शिशुच्या अतिदक्षता विभागात म्हणजेच एनआयसीयू ठेवण्यात आलं, जिथं त्याला ऑक्सिजन सपोर्ट आणि रक्तातील साखरेचे निरीक्षण करण्यात आलं. त्याची प्रकृती लवकरच सामान्य झाली आणि दोघांनाही रुग्णालयातून सोडण्यात आलं.
शेल्बी मार्टिनची कहाणी सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाली. ती आधीच तिच्या प्रेग्नन्सीचे अनुभव टिकटॉक या सोशल मीडियावर शेअर करत होती, ज्यामुळे लोक तिच्या असामान्यपणे मोठ्या बेबी बम्पने थक्क झाले होते.