रेडिटवर एका वापरकर्त्याने आपला अनुभव शेअर केला. एका तरुणाला पहिली नोकरी मिळाली… पण त्याने ती फक्त आणि फक्त तीन तासांत सोडली, असं तिथे शेअर करण्यात आलं आहे. या पोस्टने इंटरनेटवर खळबळ उडवली. कारण यामुळे लोकांना असंख्य प्रश्न पडू लागले. एवढ्या लवकर नोकरी शोधण्यामागचं काय कारण? त्याला नोकरी का नसेल आवडली? मॅनेजर नसेल आवडला का? असं काय घडलं असेल त्या तीन तासात ज्यामुळे त्याने हा निर्णय घेतला? वैगरे वैगरे.....
advertisement
तर यामागचं कारण त्या तरुणाने स्वत:च सांगितलं. तो म्हणाला, “वर्क फ्रॉम होम जॉब होता. कामाचा ताण कमी, पण 9 तासांची शिफ्ट आणि पगार फक्त 12 हजार. मी ही नोकरी जॉईन करण्यापूर्वी विचार केला मॅनेज होईल… पण तीन तासांत कळलं की माझ्या करिअरच्या ग्रोथसाठी याचा काहीच फायदा नाही.”
Got my first job , Quit 3 hours lateradvertisement
तो पुढे सांगतो की कंपनीने सुरुवातीला हा पार्ट-टाईम जॉब म्हणून जाहिरात केली होती. पण प्रत्यक्षात त्याच्या हातात फुल-टाईम नोकरी दिली गेली. “मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. पार्ट-टाईम शोधत होतो. त्यांनी पार्ट-टाईम सांगितलं आणि फुल-टाईम दिलं… हे मला जमलंच नसतं,” असं त्याने पुढे लिहिलं.
ही पोस्ट व्हायरल होताच प्रतिक्रिया दोन गटांत विभागल्या काहींनी लिहिलं की त्याने अगदी बरोबर केलं. तर काहींचं म्हणणं आहे त्याने असं करायला नको होतं, फक्त तीन तासात नोकरी सोडणं म्हणजे त्याने जराही विचार केला नसावा.
काहींनी तर त्याचं हे वागणं स्पष्टपणे बाउंड्री सेट करणं प्रेरणादायी असल्याचंही लिहिलं. तर एका टिकाकराने लिहिलं की “असं चालत नाही… अनुभवाच्या नावाने तरी राहायला हवं होतं” “या मानसिकतेसह तुम्ही कोणत्याही नोकरीसाठी पात्र नसाल… प्रत्येक दिवस चांगला नसतो,” असं देखील एका व्यक्तीचं म्हणणं आहे.
