मेट्रोमधील अनेक निरनिराळे व्हिडीओ समोर येत असतात. सध्या एका तरुणाचा मेट्रोमध्ये डान्स व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय. टिंकू जियावर त्यानं ठुमके लगावले असून त्याचा डान्स पाहून मेट्रोमधील इतर प्रवासीही थक्क झाले. काहीजणांना तर हसूही आवरलं नाही.
advertisement
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक मुलगा विचित्र कपडे घालून आणि विचित्र चष्मा घालून 'टिंकू जिया' गाण्यावर डान्स करत आहे. त्याच्या आजूबाजूला बसलेले लोक डान्स पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
delhi.connection नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर अनेक कमेंटही पहायला येत असून हा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला आहे. असे मजेशीर, विचित्र व्हिडीओ मेट्रोमध्ये समोर येत असतात. खास करुन दिल्ली मेट्रोमध्ये.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 08, 2024 11:44 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Viral Video : टिंकू जिया गाण्यावर 'खतरनाक' डान्स, मेट्रोमध्येच तरुणाचा हटके जलवा
