advertisement

प्रेमासाठी कायपण! 80 व्या वर्षी प्रेमात आकंठ बुडाली महिला, 23 वर्षांनी लहान व्यक्तीसाठी काहीपण करायला तयार

Last Updated:

प्रेम कधी कोणावर होईल सांगता येत नाही. प्रेमात लोक आंधळे होतात, असं म्हटलं जातं. कारण रंग, जात, वय याचं बंधन न बाळगता लोकांचं एकमेकांवर प्रेम होत असतं. प्रेमाच्या अनेक निरनिराळ्या घटना समोर येत असतात.

80 व्या वर्षी प्रेमात आकंठ बुडाली महिला
80 व्या वर्षी प्रेमात आकंठ बुडाली महिला
नवी दिल्ली: प्रेम कधी कोणावर होईल सांगता येत नाही. प्रेमात लोक आंधळे होतात, असं म्हटलं जातं. कारण रंग, जात, वय याचं बंधन न बाळगता लोकांचं एकमेकांवर प्रेम होत असतं. प्रेमाच्या अनेक निरनिराळ्या घटना समोर येत असतात. अशीच एक घटना सध्या चर्चेत आलीय, ज्यामध्ये 80 वर्षीय महिलेला 23 वर्षांनी लहान पुरुषांवर प्रेम झालं. हे प्रेमप्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
वयाच्या 80 व्या वर्षी महिला 23 वर्षांनी लहान असलेल्या आणि ड्रग्जच्या आहारी गेलेल्या व्यक्तीच्या प्रेमात पडली. प्रेम इतकं फुलले की ती त्याला सर्वस्व द्यायला तयार झाली. तिनं मुलींनाही नाकारलं. ती प्रेमात इतकी वेडी झाली होती की ती तिची सर्व संपत्ती तिच्या प्रियकराला द्यायला तयार झाली.
हे प्रकरण अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, कायुकोस येथील रहिवासी असलेल्या कॅरोलिन हॉलंडच्या पतीचा 2015 मध्ये मृत्यू झाला होता. दोन मुलांची आई कॅरोलिन नंतर एकटी पडली. हा एकटेपणा तिला खात होता. त्यामुळे ती साथीदाराच्या शोधत होती. यादरम्यान तिची भेट 57 वर्षीय डेव्ह फाउटशी झाली. दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झालं समजलं नाही.
advertisement
दुसरीकडे, डेव्ह एक बेघर व्यक्ती होता. तो अनेकदा समुद्राच्या किनाऱ्यावर झोपलेला दिसला. पण प्रेमात पडताच कॅरोलिनने त्याला आपल्यासोबत एका आलिशान घरात आणलं. दोघे एकत्र राहू लागले. कॅरोलिनच्या मुलींनी सांगितलं, डेव्हचा हेतू चुकीचा होता. त्याला आईची कमाई हडप करायची होती. कॅरोलिन ही अल्झायमरची शिकार आहे हे दोघांनाही माहीत होतं. ती विसरत राहते. याचा फायदा घेत डेव्ह आपली सर्व मालमत्ता आपल्या नावावर करू शकतो त्यामुळे मुलींनी त्याची चौकशी केली. डेव्ह हा ड्रग्ज व्यसनी असल्याचं उघड झालं. तो ड्रग्जचा व्यवहार करायचा. पाईप बॉम्ब बनवल्याबद्दल त्यानं 10 वर्षे तुरुंगवासही भोगला होता. हे सर्व समजल्यावर मुली अधिक चिंतेत पडल्या.
advertisement
मुलींनी आपल्या आईला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र आई कॅरोलिन तिच्या निर्णयावर ठाम होती. मुलींनी आधी त्यांच्या आईला समजावले, पण कॅरोलिन ठाम होती. डेव्हच्या प्रेमात ती आकंठ बुडाली होती. त्यानंतर मुलींनी कोर्टात धाव घेतली. कॅरोलिनने डेव्हला 40000 डॉलर म्हणजेच 34 लाख रुपयेही दिले होते. शेवटी एक दिवस आला की कॅरोलिनचा मृत्यू झाला. तेव्हा डेव्ह कुठेतरी बाहेर गेला होता. मुलींनी डेव्हला याबद्दल काहीही सांगितलं नाही. पॉवर ऑफ अॅटर्नी मिळवण्यात त्यांना यश आलं. मात्र त्यांना दुःख आहे की, आईला वाचवू शकलो नाही.
view comments
मराठी बातम्या/Viral/
प्रेमासाठी कायपण! 80 व्या वर्षी प्रेमात आकंठ बुडाली महिला, 23 वर्षांनी लहान व्यक्तीसाठी काहीपण करायला तयार
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement