Unique Restaurant : असं रेस्टॉरंट जिथे पुरुषांची एण्ट्री बॅन, काय आहे कारण?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
जगभरात अनेक निरनिराळे रेस्टॉरंट आहेत. प्रत्येक रेस्टॉरंटची एक वेगळी अशी खासियत असते आणि कोणत्या न कोणत्या गोष्टीसाठी चर्चेत असतं. काही रेस्टॉरंट आपल्या चांगल्या गोष्टींसाठी चर्चेत येतात तर काही त्यांच्या विचित्र गोष्टींसाठी.
नवी दिल्ली: जगभरात अनेक निरनिराळे रेस्टॉरंट आहेत. प्रत्येक रेस्टॉरंटची एक वेगळी अशी खासियत असते आणि कोणत्या न कोणत्या गोष्टीसाठी चर्चेत असतं. काही रेस्टॉरंट आपल्या चांगल्या गोष्टींसाठी चर्चेत येतात तर काही त्यांच्या विचित्र गोष्टींसाठी. अशातच एका रेस्टॉरंटविषयी जाणून घेऊया ज्या ठिकाणी चक्क पुरुषांची एण्ट्री बॅन आहे. यामागे नेमकं काय कारण आहे पाहुया.
तुम्ही कधी असं ऐकलंय का की, एखादा पुरुष रेस्टॉरंटमध्ये येऊ शकत नाही. हे ऐकूनच विचित्र वाटेल मात्र असं एक रेस्टॉरंट असून तेथे फक्त पुरुष एण्ट्री घेऊ शकत नाही. रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांच्यासोबत एखादी महिला हवी. हे रेस्टॉरंट त्यांच्या या विचित्र अटीमुळे चर्चेत आहे.
जपानच्या टोकियोमध्ये एक रेस्टॉरंट आहे. जिथे फक्त अविवाहित पुरुष आत येऊ शकत नाही. 'निगेटिव्ह कॅफे अँड बार' असं या रेस्टॉरंटचं नाव आहे. हे टोकियोच्या शिमोकिताझावा नावाच्या परिसरात आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, हे रेस्टॉरंट 2020 मध्ये कोरोना महामारीनंतर उघडण्यात आलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या रेस्टॉरंटचे मालक नैराश्याने त्रस्त आहेत आणि नकारात्मक विचारसरणीचे लोकही येथे येऊ शकतात, कारण त्यांच्यासाठीही अशी खास जागा असावी या विचाराने त्यांनी हे रेस्टॉरंट सुरू केले.
advertisement
या रेस्टॉरंटच्या मालकाचं म्हणणं आहे की, नकारात्मक लोक दयाळू स्वभावाचे असतात. म्हणूनच मी त्यांच्यासाठी कम्फर्ट झोन तयार केला आहे. विशेष म्हणजे तुम्हाला हवं असल्यास बाहेरून जेवण आणून रेस्टॉरंटच्या आत खाऊ शकता. यासाठी कोणतंही बंधन नाही फक्त एक अट आहे. तुम्हाला रेस्टॉरंटमधील एखादी पेय तरी ऑर्डर करावं लागेल.
advertisement
दरम्यान, हे पहिलंच रेस्टॉरंट नाही ज्यामध्ये विचित्र नियम आहेत. असे अनेक रेस्टॉरंट आहे जिथे यापेक्षाही विचित्र नियम अटी आहेत. विश्वासही बसणार नाही अशा अटी बऱ्याच ठिकाणी आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 08, 2024 8:15 AM IST









