आरोपीला घेतलं ताब्यात
हा व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला. लोकं सोशल मीडियावर याबद्दल चिंता व्यक्त करू लागले. व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, ट्रेन सुरू होताच युट्युबर हळूच ट्रेनजवळ जातो आणि आपत्कालीन खिडकीजवळ बसलेल्या व्यक्तीला कानाखाली मारतो. कानाखाली मारल्यानंतर तो काहीच घडलं नाही, अशा प्रकारे हसत चालत निघून जातो.
हा व्हायरल व्हिडिओ नंतर रेल्वे सुरक्षा दलापर्यंतही पोहोचला. कारवाई करत आरपीएफने युट्युबर आणि त्याच्या मित्राला अटक केली. आरपीएफने ही माहिती आपल्या सोशल मीडियावर टाकून लिहिलं की, आम्ही आरोपीला ताब्यात घेतलं आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड केली जाऊ शकत नाही.
advertisement
अटक झाल्यानंतर मागितली माफी
ताब्यात घेतल्यानंतर युट्युबरने माफी मागताना एक व्हिडिओ पोस्ट केला. युट्युबर म्हणतो, "मी एक युट्युबर आहे आणि इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर माझ्या फॉलोअर्ससाठी व्हिडिओ पोस्ट करतो. फॉलोअर्स वाढवण्याच्या उद्देशाने मी रेल्वे स्थानकावर आलो आणि चालत्या ट्रेनमध्ये एका प्रवाशाला कानाखाली मारली. मला माहीत आहे की, ही खूप मोठी चूक आहे आणि मी ती पुन्हा करणार नाही. कृपया मला माफ करा."
सोशल मीडियावर लोकांचा संताप
सोशल मीडियावर लोकांनी या व्हिडिओवर आपला राग व्यक्त केला आहे. आतापर्यंत 80 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. आपला राग व्यक्त करत एका युजरने लिहिलं की, आजकाल लोकांना काय झालं आहे. हा त्रास आहे. दुसऱ्या युजरने लिहिलं की, मला आनंद आहे की त्याला अटक करण्यात आली आहे. आता इतर लोकांसाठी हा चांगला धडा असेल.
हे ही वाचा : पत्नीला फोन करून बोलावलं, तिच्यासोबत आई आली, दोघी खोलीत जाताच दरवाजा केला बंद आणि पुढे...
हे ही वाचा : तो निवांत झोपला होता, 4 लोक घरात घुसले, चोरी सोडून कापलं त्याचं गुप्तांग, इतकंच नाही पुढे...