Budh Shukra Ast: 12 दिवसांचा भोग उरला! बुध-शुक्राचा अस्ताने या राशींच्या जीवनात सुवर्णकाळ, गुड न्यूज
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Budh Shukra Ast: मार्च महिन्यात बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह अस्त होणार आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह हा बुद्धिमत्तेचा कारक मानला जातो तर शुक्र ग्रह हा भौतिक सुख आणि समृद्धीचा कारक आहे. या दोन्ही ग्रहांच्या अस्त होण्याने काही राशींना लाभ...
मुंबई : हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गुरु आणि शुक्र ग्रहांची स्थिती पाहणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या दोन्ही ग्रहांची अनुकूल स्थिती शुभ कार्यासाठी आवश्यक मानली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाच्या अस्त होण्याने शुभ कार्यात अडथळे येऊ शकतात. मार्च महिन्यात बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह अस्त होणार आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह हा बुद्धिमत्तेचा कारक मानला जातो तर शुक्र ग्रह हा भौतिक सुख आणि समृद्धीचा कारक आहे. या दोन्ही ग्रहांच्या अस्त होण्याने काही राशींना लाभ होईल तर काहींना सावध राहण्याची आवश्यकता आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 18 मार्च रोजी सकाळी 7:03 वाजता शुक्र ग्रह अस्त होणार आहे तर बुध ग्रह 17 मार्च रोजी संध्याकाळी 7:31 वाजता अस्त होणार आहे. या दोन्ही ग्रहांच्या अस्त होण्याने काही राशींना विशेष फायदा होऊ शकतो.
वृषभ राशीच्या लोकांसाठी बुध आणि शुक्राचे अस्त होणे खूप फायदेशीर ठरू शकते. हे दोन्ही ग्रह वृषभ राशीपासून 11 व्या घरात अस्त होतील. यामुळे वृषभ राशीच्या लोकांना आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण अनुभवता येतील. नवीन मित्र बनतील आणि संवाद कौशल्याच्या जोरावर अनेक ठिकाणी यश मिळेल. करिअरमध्ये अनेक नवीन संधी येतील आणि अनेक इच्छा पूर्ण होतील. व्यापार करणाऱ्यांना हा काळ अनुकूल राहील. समाजात मान-सन्मान वाढेल. व्यवसाय भागीदारांकडून चांगले सहकार्य मिळेल. पैसा कमावण्याचे अनेक मार्ग उपलब्ध होतील आणि बचत करण्याचीही संधी मिळेल. प्रेम जीवनात आनंद राहील.
advertisement
कुंभ राशीच्या दुसऱ्या घरात बुध आणि शुक्र अस्त होणार आहेत. यामुळे कुंभ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. काही समस्या उद्भवू शकतात पण त्यावर मात करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. करिअरमध्ये चांगले यश मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. व्यवसायात योग्य नियोजन केल्यास नक्कीच यश मिळेल. जोडीदारा सोबत चांगला वेळ घालवता येईल.
advertisement
सिंह राशीच्या आठव्या घरात बुध आणि शुक्र अस्त होणार आहेत. यामुळे सिंह राशीच्या लोकांना जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळू शकेल. आयुष्यात आनंद येईल. सासरच्या मंडळींशी संबंध सुधारतील. आळस कमी होईल आणि उत्साह वाढेल.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 05, 2025 12:47 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Budh Shukra Ast: 12 दिवसांचा भोग उरला! बुध-शुक्राचा अस्ताने या राशींच्या जीवनात सुवर्णकाळ, गुड न्यूज