आज वसंत पंचमी! या राशींना कष्टाचे फळ मिळणार, सुख शांतीसह आर्थिक भरभराट होणार

Last Updated:

Vasant Panchami : आयुष्यात कितीही मेहनत केली तरी अनेकदा अपेक्षित यश मिळत नाही, अशी भावना अनेकांच्या मनात असते. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार, योग्य वेळी ग्रहांची अनुकूल साथ मिळाली तर नशीब अचानक कलाटणी घेते.

Astrology News
Astrology News
मुंबई : आयुष्यात कितीही मेहनत केली तरी अनेकदा अपेक्षित यश मिळत नाही, अशी भावना अनेकांच्या मनात असते. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार, योग्य वेळी ग्रहांची अनुकूल साथ मिळाली तर नशीब अचानक कलाटणी घेते. 2026 मधील वसंत पंचमी, म्हणजेच आज 23 जानेवारी, हा दिवस काही राशींसाठी असाच भाग्यकारक ठरणार आहे. या दिवशी एक-दोन नव्हे तर तब्बल पाच शुभ आणि दुर्मिळ राजयोग एकाच वेळी निर्माण होत आहेत. त्यामुळे काही निवडक राशींच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येण्याची दाट शक्यता आहे.
ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, वसंत पंचमीच्या दिवशी बुधादित्य योग, लक्ष्मी नारायण योग, रुचक योग आणि गजकेसरी राजयोग एकत्रितपणे सक्रिय होतील. बुध, शुक्र आणि मंगळ हे ग्रह मकर राशीत युती करत असून, गुरू आणि चंद्र यांच्या संयोगातून शक्तिशाली गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. यासोबतच शिवयोगाचाही प्रभाव राहणार आहे. या सर्व ग्रहयोगांचा एकत्रित परिणाम पाच राशींवर विशेष अनुकूल ठरेल. या राशींच्या लोकांना मान-सन्मान, आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि मानसिक समाधान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांसाठी वसंत पंचमी अत्यंत शुभ ठरणार आहे. गजकेसरी राजयोग या राशीच्या नवव्या घरात तयार होत असल्याने भाग्याची पूर्ण साथ मिळेल. शिक्षण क्षेत्रात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष फलदायी असेल. ज्ञानात वाढ होईल आणि समाजात प्रतिष्ठा मिळेल. वडिलांचा पाठिंबा लाभेल तसेच वडिलोपार्जित मालमत्तेतून फायदा होण्याची शक्यता आहे. अध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल आणि केलेल्या कामाची नवी ओळख निर्माण होईल.
advertisement
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांना या ग्रहयोगांमुळे मानसिक शांतीचा अनुभव येईल. दीर्घकाळापासून असलेला ताण कमी होऊन समाधानाची भावना निर्माण होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मुलांकडून एखादी आनंददायक बातमी मिळण्याची शक्यता आहे. कला, लेखन, डिझाइन किंवा सर्जनशील क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना विशेष लाभ होईल. पूर्वी केलेल्या मेहनतीचे योग्य फळ या काळात मिळू शकते.
advertisement
धनु रास
धनु राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या हा काळ अत्यंत लाभदायक ठरणार आहे. बुधादित्य, लक्ष्मी नारायण आणि रुचक राजयोग दुसऱ्या घरात तयार होत असल्याने उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. वाणीचा प्रभाव वाढेल, त्यामुळे व्यवहारात यश मिळेल. नवीन उत्पन्नाचे स्रोत सुरू होऊ शकतात. कुटुंबात सौख्य वाढेल आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल.
मकर रास
मकर राशीत एकाच वेळी अनेक राजयोग निर्माण होत असल्याने या राशीच्या लोकांसाठी हा काळ सुवर्णसंधी ठरू शकतो. ज्ञान, संपत्ती आणि प्रतिष्ठा यामध्ये वाढ होईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय किंवा प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. केलेल्या कामातून चांगला नफा मिळू शकतो आणि करिअरमध्ये मोठी झेप घेता येईल.
advertisement
मीन रास
मीन राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग विशेष लाभदायक ठरणार आहे. चंद्र आणि गुरू यांच्या संयोगामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होईल. समाजात मान-सन्मान वाढेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. स्वतःच्या क्षमतेचा पुरेपूर उपयोग करता येईल आणि आत्मविश्वास वाढेल.
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
आज वसंत पंचमी! या राशींना कष्टाचे फळ मिळणार, सुख शांतीसह आर्थिक भरभराट होणार
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement