advertisement

कर्क आहे तुमची रास मग यंदा दिवाळी आहे खास, या तारखेनंतर उजळेल भाग्य, VIDEO

Last Updated:

कर्क राशीच्या लोकांना नोव्हेंबर कसा असणार? इथं पाहा आपल्या राशीचं मासिक भविष्य...

+
कर्क

कर्क आहे तुमची रास मग यंदा दिवाळी आहे खास, या तारखेनंतर उजळेल भाग्य, VIDEO

नागपूर, 30 ऑक्टोबर: अंतराळात असलेल्या ग्रहांच्या भ्रमनाचा व संयोगाचा व्यक्तीच्या राशीमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक काळ, वेळ आणि तिथीला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यानुसार प्रत्येक महिना हा त्या त्या राशींसाठी काही महत्वपूर्ण बदल व्यक्तींच्या जीवनात घडवून आणत असतो. आगामी नोव्हेंबर महिना हा कर्क राशींसाठी कसा असेल? हा महिना कर्क राशींतील लोकांना कोणते शुभ फळ देऊन जाईल? यासह या महिन्यात काय विशेष खबरदारी घ्यावी याबाबत नागपूरचे ज्योतिषशास्त्र अभ्यासक ज्योतिर्वेद डॉ. भूषण यांनी माहिती दिली आहे.
कर्क राशीसाठी नोव्हेंबर असेल संमिश्र
नोव्हेंबर महिन्यामध्ये चार मुख्य ग्रहांचे भ्रमण होत असून या भ्रमणांचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. यातील मुख्य असे शुक्र, बुध, शनि आणि राहू या चार ग्रहांचा समावेश आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या राशिभविष्याला कलाटणी देणारा असा काळ ठरेल. विशेषता कर्क राशी बद्दल बोलायचे झाल्यास कर्क राशीच्या भाग्य स्थानातून राहूचे भ्रमण होईल. त्याचे परिणाम कर्क राशीवर विशेषत्वाने दिसून येतील, असे डॉ. भूषण सांगतात.
advertisement
चार ग्रहांच्या या भ्रमणामुळे नोव्हेंबर महिना कर्क राशीसाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. कर्क राशीमध्ये राहूचे भ्रमण भाग्यभावात होईल तेव्हा कर्क राशीतील लोकांची कामे बिघडण्यास सुरुवात होईल. परिणामी मनाची चिडचिड सुरू होईल. वैयक्तिक जीवनात वाद विवाद व वैवाहिक जीवनात क्लेश निर्माण होईल, असंही भूषण सांगतात.
advertisement
17 नोव्हेंबर नंतर उजळेल भाग्य
17 नोव्हेंबर नंतर कर्क राशीमध्ये सूर्याचा प्रवेश होईल. मनाजोगी कामे होण्यास सुरुवात होईल. नवीन जबाबदारी, नव्या संधी चालून येतील. यासह नवीन वाहन, नवीन घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा ठरेल. नोव्हेंबर महिन्यात शुक्राचे भ्रमण होईल. तेव्हा सर्व अडलेली कामे पूर्ण होण्यास गती प्राप्त होऊल शनीच्या मार्गामुळे कर्क राशीतील लोकांसाठी सकारात्मक बदल जाणून येईल. अतिरिक्त जबाबदारी, रोजगाराच्या नवीन संधी चालून येतील. कर्क राशीतील लोकांसाठी 17 नोव्हेंबर नंतर भाग्याची साथ लाभेल, अशी माहिती ज्योतिषशास्त्र अभ्यासक ज्योतिर्वेद डॉ. भूषण यांनी दिली.
advertisement
ही घ्यावी काळजी 
नोव्हेंबर महिन्यामध्ये कर्क राशींच्या लोकांसाठी काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. या महिन्यांमध्ये पोटाचे आजार, पायात व पोटात अचानक दुखणे उद्भवू शकते. परिणामी शिवनामाचा जप करावा. कर्क राशीसाठी आराध्य चंद्रदेव असून देवाच्या पूजेसाठी महादेवाच्या पिंडीवर पाणी 'ओम बेलमपत्राय नमः' हा जप शिवाचे स्मरण करून करावा. असे केल्याने ऐच्छिक फळप्राप्ती होईल, अशी माहिती ज्योतिषशास्त्र अभ्यासक ज्योतिर्वेद डॉ. भूषण यांनी दिली
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
कर्क आहे तुमची रास मग यंदा दिवाळी आहे खास, या तारखेनंतर उजळेल भाग्य, VIDEO
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement