हिंदू पंचांग नेमके कसे पाहतात, हे कुणी तयार केलं?, जाणून घ्या, याचे वैज्ञानिक आणि धार्मिक महत्त्व..
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
हिंदु पंचांग नेमके कसे पाहिले जाते, याचा शोध कुणी लावला होता, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतात. तेच आपण आज जाणून घेणार आहोत.
अभिषेक जायसवाल, प्रतिनिधी
वाराणसी : हिंदू पंचांगाला विक्रम संवत किंवा हिंदी कॅलेंडरही म्हटले जाते. हिंदू धर्मात वेळ गणना आणि सणांच्या तिथी ठरवण्यासाठी याचा उपयोग केला जातो आणि हे सर्व समजून घेणे आणि तारखा जाणून घेणे ही एक कला आहे. हे पंचांग धार्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक महत्त्व आहे. त्यामुळे अशावेळी हिंदु पंचांग नेमके कसे पाहिले जाते, याचा शोध कुणी लावला होता, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतात. तेच आपण आज जाणून घेणार आहोत.
advertisement
काय आहे हिंदू पंचांग -
काशी येथील प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पंडित संजय उपाध्याय यांनी याबाबत महत्त्वाची दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, हिंदू पंचांगात 5 भाग असतात. यांच्या गणनेवरुन दिवसाची तिथी, नक्षत्र, योग, करण आणि वार ठरवला जातो. हे 5 भाग एका निश्चित दिवसासाठी एकत्र होतात. यामुळे दिवसाच्या शुभ-अशुभ आणि धार्मिक कार्यांचे मार्गदर्शन केले जाते. तिथी ही चंद्राच्या स्थितीच्या आधारावर ठरवली जाते. तसेच नक्षत्रांचे महत्त्व हे जन्म आणि धार्मिक कार्यात असते.
advertisement
हिंदू पंचांगाचा इतिहास काय -
हिंदू पंचांगाचा शोध कुणी लावला असाही प्रश्न केला जातो. तर याचा शोध कुणी एका व्यक्तीने लावला नाही. तर हा अनेक वर्षांच्या वैज्ञानिक आणि ज्योतिषशास्त्रीय अभ्यासाचा परिणाम आहे. त्याचे मूळ स्वरूप प्राचीन काळात राजा विक्रमादित्यच्या काळात विकसित झाले होते. मात्र, त्याची मुळे वैदिक काळातही हे होते, असे मानले जाते. त्या काळातील ऋषीमुनींनी ग्रहांची हालचाल, चंद्र आणि सूर्य यांच्या स्थानांवर आधारित वेळ मोजली आणि पंचांगाची रचना केली, असे ते म्हणाले.
advertisement
काय आहे वैज्ञानिक आणि धार्मिक आधार -
पंचांगाचा वैज्ञानिक आधार ग्रहांची गति आणि खगोलीय घटनांवर आधारित आहे. चंद्राची गती, सूर्याची स्थिती आणि इतर ग्रहांची स्थिती लक्षात घेता वेळेचे विभाजन करण्यात आले आहे. विविध सण, व्रत आणि शुभ कार्यांसाठी योग्य वेळ ठरवण्यासाठी धार्मिक दृष्टिकोनातून पंचांग वापरले जाते.
advertisement
धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व काय -
पंचांग हे फक्त धार्मिक आणि सांस्कृतिक मार्गदर्शनासोबतच जीवनातील संतुलन आणि शिस्त राखण्यासाठीही आवश्यक आहे. यात वैज्ञानिक आणि धार्मिक अशा दोन्ही पैलूंचा समावेश असल्याने ते महत्त्वाचे आहे, असेही प्रसिद्ध ज्योतिषाचार्य संजय उपाध्याय यांनी सांगितले.
advertisement
सूचना - ही माहिती ज्योतिषी, पंडित यांच्याशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
Location :
Varanasi,Uttar Pradesh
First Published :
August 16, 2024 3:59 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
हिंदू पंचांग नेमके कसे पाहतात, हे कुणी तयार केलं?, जाणून घ्या, याचे वैज्ञानिक आणि धार्मिक महत्त्व..