Kamada Ekadashi: सगळं असूनही मानसिक शांती नाही? कामदा एकादशीस श्रीहरीला अर्पण करा ही फूलं
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Kamada Ekadashi 2025 : या वर्षी कामदा एकादशी 8 एप्रिल रोजी आहे. आपण या दिवशी उपवास करणार असाल तर श्रीहरीला कोणती फुले अर्पण करावी याविषयी ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा सांगत आहेत.
मुंबई : हिंदू धर्मात कामदा एकादशीला खूप महत्त्व आहे. हा दिवस अर्थातच श्रीहरी विष्णूंच्या व्रत-उपासनेसाठी विशेष मानला जातो. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो, असे मानले जाते. या वर्षी कामदा एकादशी 8 एप्रिल रोजी आहे. आपण या दिवशी उपवास करणार असाल तर श्रीहरीला कोणती फुले अर्पण करावी याविषयी ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा सांगत आहेत.
1. कमळाचे फूल: श्रीहरीला कमळाचे फूल विशेष आवडते. हे फूल सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. कामदा एकादशीला विष्णूला कमळाचे फूल अर्पण केल्याने जीवनात संपत्ती आणि आनंद प्राप्त होतो. हे फूल मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा देखील आणते.
2. तुळशीची पाने: तुळस भगवान विष्णूंना प्रिय आहे, उपासनेत तिचा वापर करण्याची परंपरा आहे. तुळशीची पाने अर्पण केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि मानसिक बळ मिळते. एकादशी व्रत समस्यांवर मात करून समृद्धी आणण्यास मदत करते.
advertisement
3. झेंडू: विष्णूसाठी झेंडूचे फूलदेखील शुभ मानले जाते. हे केशरी रंगाचे फूल अर्पण केल्याने जीवनातील दारिद्र्य आणि दुःख दूर होतात. झेंडूचे फूल समृद्धी आणि यशाचे प्रतीक आहे आणि ते कामात यश मिळविण्यास मदत करते.
advertisement
4. जाईचे फूल: जाईचे फूल त्याच्या सुगंध आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. विष्णूला अर्पण केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. हे फूल आनंद, शांती आणि समृद्धी नांदवते, तसेच नातेसंबंध गोड आणि कौटुंबिक संबंध दृढ करते.
5. जास्वंदीचे फूल: लाल रंगाचे जास्वंदीचे फूल विष्णूसाठी लाभदायक मानले जाते. हे फूल अर्पण केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात. जास्वंदी मानसिक ताण कमी करून कामात यश आणते. हे फूल शांती आणि समृद्धी देखील वाढवते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 02, 2025 7:47 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Kamada Ekadashi: सगळं असूनही मानसिक शांती नाही? कामदा एकादशीस श्रीहरीला अर्पण करा ही फूलं


