Horoscope: विवाहबाह्य नात्यात अडकण्याचा मोह! या राशींचे लाईफ होऊ शकते बरबाद, मनाचा ब्रेक
- Published by:Ramesh Patil
- trending desk
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Today Love Horoscope in Marathi for January 04, 2025: आयुष्यात प्रेम महत्त्वाचे आहे. प्रियकर-प्रेयसी किंवा जोडीदार हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक असतो. त्याच्यासोबतचे आपले संबंध कसे राहतात, यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. 04 जानेवारी 2025 लव्ह राशीफळ जाणून घेऊ.
मेष : अधिक सहनशील आणि काळजी घेणारे बनायला शिका. तुम्ही काही काळापासून कोणाचं तरी कौतुक करत असलात, तर स्वतःच्या भावना नियंत्रणात ठेवा. मित्रत्वाचं नातं जपण्यासाठीची कृती करण्यासाठी हा योग्य काळ नाही. विवाहित जोडप्यांना त्यांच्या जोडीदाराची खूप गरज भासेल. तुमच्या प्रिय व्यक्तींसोबत थोडी तडजोड करायला शिकण्याची गरज आहे.
वृषभ : तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या भावनांबद्दल तुम्ही खूप संवेदनशील आहात. प्रेमजीवन स्थिर राहायला हवं असेल, तर प्रयत्नांमध्ये वाढ करायला हवी. खासकरून विवाहित व्यक्तींनी विवाहबाह्य नात्यात अडकण्याचा मोह टाळायला हवा. कारण त्यामुळे नातेसंबंधांवर खूप विपरीत परिणाम होऊ शकतो. कोणताही मतभेद असला, तर शांत राहण्याचा प्रयत्न करा.
मिथुन : असमानता असली, तर नातेसंबंध धोक्यात आहेत. त्यामुळे प्रेमाच्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही स्वतः प्रामाणिक आहात आणि ज्या जोडीदाराला शोधता आहात त्याच्याविषयीही प्रामाणिक आहात, याची खात्री करा. कारण त्यांची जागा अन्य कोणीही घेऊ शकणार नाही. या रिलेशनशिपने किती वाटचाल केली आहे, यावर नजर टाकल्यास तुम्ही आणि जोडीदार, दोघंही आनंदी व्हाल.
advertisement
कर्क : तुमच्या प्रेमजीवनात खूप संयमाची गरज आहे. तुम्हाला ज्याची सोबत आवडते अशी व्यक्ती अखेर तुम्हाला भेटली आहे. त्यामुळे आजचा दिवस घटस्फोटासाठी उत्तम आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत काही जणांना आपल्या नातेसंबंधांत सुधारणा झाल्यासारखं जाणवेल.
सिंह : प्रेमात असलेल्या तरुणांना सल्ला द्या. तुम्हाला कायम स्पष्टीकरण द्यावं लागत असलं, तर रिलेशनशिपमधून बाहेर पडण्याची गरज आहे. या गोष्टी घडण्याची शक्यता असतेच; पण कणखर होणं तुमच्या हातात आहे. आज प्रेमाची देवता तुमच्या बाजूने असल्याने प्रेमजीवन उत्साहवर्धक रिझल्ट्स देईल. जोडीदारासोबत छोटी ट्रिप आयोजित करण्याचे संकेत आहेत. काही काळापूर्वी विवाह झालेल्यांना हे विशेषत्वाने लागू आहे.
advertisement
कन्या : प्रेमजीवन मसालेदार बनवण्यासाठी आजच्या दिवसाचा उपयोग करा. जोडीदारासोबत थोडा वेळ व्यतीत केल्यास त्यांना भावनात्मकदृष्ट्या फायदा होईल. आपल्या मुलीसाठी अनुरूप वर शोधत असलेल्या आई-वडिलांना अनेक योग्य उमेदवार सापडतील. प्रेमजीवनाच्या बाबतीत आजचा दिवस उत्तम आहे.
advertisement
तूळ : आज सावधगिरी बाळगायला हवी. जोडीदाराशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका. कारण त्याचं अगदी सहजपणे भांडणात रूपांतर होऊ शकेल. खूप पझेसिव्ह झालात, तरी तुमचा जोडीदार तुमच्यापासून दूर जाऊ शकतो. घटस्फोटित व्यक्तींनाही सामाजिक कार्यक्रमात कोणी इंटरेस्टिंग व्यक्ती भेटू शकते.
वृश्चिक : तुम्हाला आकर्षित करून घेईल आणि तुम्हाला अनुरूप असेल अशा व्यक्तीशी भेट होईल. मैत्रीपासून सुरुवात होऊ शकेल; मात्र काही दिवसांत रिलेशनशिप दृढ होईल. दोघांच्या एकत्रित वेळेचा सदुपयोग करायचा असेल, तर उत्तम ट्रिपचं आयोजन करा.
advertisement
धनू : प्रेमजीवनात गोडवा आणण्यासाठी वेळेचा उपयोग करा. जोडीदारासोबत काही वेळ व्यतीत केल्यामुळे त्याला/तिला भावनिकदृष्ट्या मदत होईल. मुलीसाठी अनुरूप वराच्या शोधात असलेल्या आई-वडिलांना अनेक योग्य उमेदवार सापडतील. रिलेशनशिपमध्ये विश्वासाचा अभाव दिसत आहे. त्यातून दोघांमध्ये दरी निर्माण होऊ शकते.
मकर : एकमेकांच्या गरजा आणि भावना सखोलपणे समजून घ्याल. त्यातून रिलेशनशिप मजबूत होईल. विभक्त झालेल्यांना इंटरेस्टिंग व्यक्तींसोबत बाहेर जाण्याची संधी मिळू शकते. प्रेमाच्या संदर्भात प्रत्येकासाठी उत्साहाचा काळ आहे. अनुरूप व्यक्ती भेटण्याची तीव्र शक्यता आहे.
advertisement
कुंभ : आज रोमान्स हॉट असेल. त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या. जोडीदाराच्या शोधात असलेल्यांनी थोडा वेळ थांबावं. स्वतःला नाकारलं जाण्याची भावना मनात येऊ देऊ नका. अधिक सोशल व्हा, वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींसाठी खुले राहा. त्यामुळे तुमच्यासाठी योग्य व्यक्ती भेटू शकेल.
advertisement
मीन : चुकीच्या दर्शनी रूपाच्या कोणा तरी व्यक्तिमत्त्वामुळे तुम्ही प्रभावित झालात, तर ते दीर्घ काळात उपयोगी ठरणार नाही. खासकरून विवाहित दाम्पत्यांसाठी गेला आठवडा निराशेचा होता. कारण किरकोळ मुद्द्यावरून मोठं भांडण होऊ शकतं. काही सिंगल व्यक्तींना अनपेक्षितपणे प्रेम सापडू शकेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 04, 2025 7:23 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Horoscope: विवाहबाह्य नात्यात अडकण्याचा मोह! या राशींचे लाईफ होऊ शकते बरबाद, मनाचा ब्रेक