PitruPaksh 2025: महाळाचा महिना..! लवकरच पितृपक्षाची सुरुवात होणार; 15 दिवस करू नये यातील एकही काम
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
PitruPaksh 2025: हिंदू धर्मानुसार प्रत्येक व्यक्तीवर तीन प्रकारची ऋणे असतात. देवऋण, ऋषीऋण आणि पितृऋण. यापैकी पितृऋण सर्वात महत्त्वाचे मानले जाते, कारण आपल्या पूर्वजांमुळेच आपल्याला हे जीवन मिळाले आहे.
मुंबई : हिंदू धर्मात अनेक सण-उत्सव-विधी परंपरा पाळल्या जातात. गणेशोत्सवानंतर सुरू होणाऱ्या पितृपक्षाला खूप मोठे धार्मिक महत्त्व आहे. हा काळ आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्यांना शांती देण्यासाठी समर्पित आहे. या पंधरा दिवसांच्या काळात केलेल्या धार्मिक कार्यांना विशेष पुण्य मानले जाते. हिंदू धर्मानुसार प्रत्येक व्यक्तीवर तीन प्रकारची ऋणे असतात. देवऋण, ऋषीऋण आणि पितृऋण. यापैकी पितृऋण सर्वात महत्त्वाचे मानले जाते, कारण आपल्या पूर्वजांमुळेच आपल्याला हे जीवन मिळाले आहे. पितृपक्षात श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केल्याने हे पितृऋण फेडले जाते.
मृत्यू झालेल्या व्यक्तीचा आत्मा पितृलोकात राहतो. पितृपक्षात श्राद्ध आणि तर्पण केल्याने त्यांच्या अतृप्त इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना पुढील गती मिळते. त्यामुळे त्यांना मोक्ष मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. असे मानले जाते की पितृपक्षात पूर्वज पृथ्वीवर येतात आणि आपल्या कुटुंबातील लोकांना आशीर्वाद देतात. श्राद्ध विधी केल्याने ते प्रसन्न होतात आणि कुटुंबात सुख-समृद्धी नांदते. त्यामुळे वंशवृद्धी होते, आरोग्याच्या समस्या दूर होतात आणि घरात शांतता राहते. ज्या कुटुंबात पितृदोष असतो, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पितृपक्षात विधीपूर्वक श्राद्ध केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि कुटुंबातील अनेक समस्या दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
पितृपक्षात कोणती कामं करू नयेत:
पितृपक्षाचा काळ हा आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याचा आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळवून देण्याचा असतो. त्यामुळे या काळात काही गोष्टी करणे टाळावे, असे मानले जाते.
शुभ कार्ये: पितृपक्षात लग्न, साखरपुडा, नवीन घरात प्रवेश (गृहप्रवेश) यांसारखी कोणतीही शुभ कार्ये करू नयेत.
advertisement
नवीन वस्तूंची खरेदी: नवीन कपडे, दागिने, घर किंवा वाहन खरेदी करणे टाळावे.
तामसिक पदार्थ: या काळात कांदा, लसूण आणि मांसाहार यांसारख्या तामसिक पदार्थांचे सेवन करू नये.
केस आणि नखे कापणे: या काळात केस आणि नखे कापणे किंवा दाढी करणे टाळावे असे सांगितले जाते.
दान: पितृपक्षाच्या काळात झाडू, मोहरीचे तेल किंवा मीठ यांसारख्या वस्तू दान करू नयेत.
advertisement
कर्ज: या काळात कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नयेत.
या काळात आपल्या पूर्वजांचे स्मरण करणे, त्यांना पिंडदान करणे आणि गरजू लोकांना मदत करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 28, 2025 3:34 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
PitruPaksh 2025: महाळाचा महिना..! लवकरच पितृपक्षाची सुरुवात होणार; 15 दिवस करू नये यातील एकही काम