Shravan 2025: श्रावण शुक्रवारी चुकवू नका या गोष्टी; घराच्या सुख-समृद्धी-संततीशी आहे थेट संबंध

Last Updated:

Shravan 2025: या वर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 15 ऑगस्ट रोजी असल्यानं या दिवशी श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जाईल. दहीहंडीचा उत्सव 16 ऑगस्ट रोजी साजरा होईल.

News18
News18
मुंबई : श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक शुक्रवाराला विशेष महत्त्व आहे. या दिवशी दोन प्रमुख पूजा केल्या जातात. त्याशिवाय महत्त्वाचे म्हणजे शुक्रवारी भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणजे 15 ऑगस्ट असून हा भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन आहे. हा दिवस देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच या वर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 15 ऑगस्ट रोजी असल्यानं या दिवशी श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जाईल. दहीहंडीचा उत्सव 16 ऑगस्ट रोजी साजरा होईल.
श्रावण शुक्रवार असल्यानं जरा-जिवंतिका (जिवती) पूजन केले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी सौभाग्यवती महिला आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी ही पूजा करतात.
पूजा विधी : या दिवशी 'जिवती' (जरा-जिवंतिका) मातेचे चित्र भिंतीवर लावले जाते किंवा कागदावर असलेले चित्र वापरले जाते. या प्रतिमेला हळद-कुंकू लावून फुले, दुर्वा आणि आघाड्याची माळ अर्पण केली जाते. पूजा झाल्यावर मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण केले जाते. यामुळे मुलांवर येणारी संकटे टळतात, अशी श्रद्धा आहे. या पूजेमध्ये पुरणपोळी, गूळ-खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच काही ठिकाणी कणकेचे दिवे बनवून त्यात तूप घालून ते दिवे लावतात. या पूजेसोबतच मुलांच्या कल्याणासाठी 'जिवतीची कहाणी' ऐकली जाते.
advertisement
देवी लक्ष्मी आणि वरदलक्ष्मी व्रत: 
श्रावण महिना हा केवळ भगवान शंकरासाठीच नाही, तर देवी लक्ष्मीच्या उपासनेसाठीही महत्त्वाचा मानला जातो. प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मीचे पूजन केले जाते. विवाहित महिला आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि अखंड सौभाग्यासाठी देवी लक्ष्मीची पूजा करतात. श्रावण महिन्यातील शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रताचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी वरदलक्ष्मी देवीची पूजा केली जाते. या व्रतामुळे धन, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. या दिवशी सुवासिनी महिला देवीची ओटी भरतात. नऊवारी साडी, खण, नारळ, हळद-कुंकू, आणि सौभाग्याच्या वस्तू ओटीमध्ये ठेवतात.
advertisement
श्रावणातील शुक्रवारी आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी जिवतीची पूजा आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. हे दिवस धार्मिक आणि कौटुंबिक दोन्ही दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shravan 2025: श्रावण शुक्रवारी चुकवू नका या गोष्टी; घराच्या सुख-समृद्धी-संततीशी आहे थेट संबंध
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement