Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीच्या पूजेचे 3 वास्तू नियम लक्षात ठेवा; बाप्पाची अखंड कृपा कुटुंबावर

Last Updated:

Ganesh Chaturthi Vastu tips 2025: बाप्पाच्या पूजेदरम्यान काही वास्तु नियमांचे पालन केले पाहिजे. गणेश चतुर्थीच्या दिवशी वास्तु नियमांनुसार सजावट आणि बाप्पाची स्थापना केल्यास विशेष शुभ फळ मिळते. गणेश चतुर्थीच्या निमित्त कोणते वास्तु नियम पाळले पाहिजेत, याविषयी जाणून घेऊ.

News18
News18
मुंबई : दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणरायाचे आगमन होते. सर्वत्र उत्साह असतो, धुमधडाक्यात घरोघरी, सार्वजनिक मंडळांचे बाप्पा विराजमान होतात. बाप्पाच्या आकर्षक मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाते, विधीपूर्वक बाप्पाची पूजा केली जाते. बाप्पाच्या पूजेदरम्यान काही वास्तु नियमांचे पालन केले पाहिजे. गणेश चतुर्थीच्या दिवशी वास्तु नियमांनुसार सजावट आणि बाप्पाची स्थापना केल्यास विशेष शुभ फळ मिळते. गणेश चतुर्थीच्या निमित्त कोणते वास्तु नियम पाळले पाहिजेत, याविषयी जाणून घेऊ.
गणरायाची स्थापना विधी -
वास्तुशास्त्रात कोणत्याही पूजेविषयी अनेक नियम तपशीलवार सांगितले आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण पूजनामध्ये वास्तू नियमांचे पालन केले पाहिजे. गणेशाची मूर्ती स्थापन करण्यासाठी पाठ किंवा चौरंग घ्यावा. घरात ईशान्य दिशेला मूर्ती स्थापन करण्यासाठी जागा निवडा. येथे पाट किंवा चौरंग मांडून गणपतीची मूर्ती स्थापित करावी. चौरंगा भोवतीचा फुले, केळीची पाने इत्यादींनी आकर्षक सजावट करावी. अशा प्रकारे घरात गणपतीची मूर्ती स्थापित केल्याने तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी येते.
advertisement
दरवाजाशी संबंधित वास्तू नियम - गणेश चतुर्थीच्या काळात घराचा दरवाजा आकर्षक सजवणं खूप शुभ मानलं जातं. दरवाजातून श्री गणेश आपल्या घरात प्रवेश करतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी दरवाजावर आंब्याच्या पानांचे तोरण लावावे. यासोबतच, दरवाजावर स्वस्तिक चिन्ह देखील काढावे. दारात रांगोळी काढणे देखील खूप शुभ मानले जाते. यामुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होते, शिवाय श्री गणेशजी जीवनातील अडचणी दूर करतात.
advertisement
रंगांची विशेष काळजी घ्या - गणेश चतुर्थीनिमित्त घराची सजावट करताना, रंगांचा वापर खूप काळजीपूर्वक केला पाहिजे. पूजनाशी संबंधित कोणत्याही गोष्टींमध्ये चुकूनही काळा, तपकिरी, गडद निळा रंग वापरणे टाळावे. वास्तुनुसार गणेश चतुर्थीसारख्या धार्मिक प्रसंगी लाल, गुलाबी, पिवळा आणि हिरवा रंग वापरावा. या रंगांचा वापर केल्याने घरात सकारात्मकता राहते आणि आपल्याला देवाचे आशीर्वाद देखील मिळतात.
advertisement
advertisement
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीच्या पूजेचे 3 वास्तू नियम लक्षात ठेवा; बाप्पाची अखंड कृपा कुटुंबावर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement