Samruddhi Mahamarg: 'समृद्धी' वर अपघात का होतात? पहिल्यांदाच महायुतीच्या मंत्र्याने सांगितलं कारण

Last Updated:

प्रताप सरनाईक यांनी रोड हिप्नोसिस या शब्दाचा उल्लेख केला आहे. खरंतर याला हायवे हिप्नोसिस (Highway Hypnosis) असं सुद्धा म्हटलं जातं.

News18
News18
पुणे : मुंबई ते नागपूरला जोडण्यासाठी मोठा गाजावाजा करून समृद्धी महामार्ग सुरू करण्यात आला आहे. पण, मागील काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अनेक अपघात आणि घटनांमुळे चर्चेत राहिला आहे. समृद्धी महामार्गावर वारंवार अपघात का घडतात याची कारण शोधली जात आहे. अशातच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रोड हिप्नोसिसमुळे महामार्गावर अपघातात होता, अशी कबुली दिली आहे.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे पुण्याच्या दौऱ्यावर होते. मर्सिडीज कंपनीने रस्ते अपघातासाठी उपाययोजना केली आहे. या कार्यक्रमाला सरनाईक हजर होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी समृद्धी महामार्गावर अपघात कशामुळे होतात याची माहिती दिली.
'समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राची भाग्य रेषा आहे. मुंबई ते नागपूर जलद मार्गाने पोहोचता येतं. पण या महामार्गावर 'रोड हिप्नोसिस' मुळे अनेक वेळा अपघातात होत असतात. ही अवस्था टाळण्यासाठी अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी मर्सिडीज कंपनीने समृद्धी महामार्ग दत्तक घेतला आहे. या उपक्रमातून चालकांनी प्रशिक्षण देणे, अपघाताच्या ठिकाणी बोर्ड लावले, अपघात घडला त्या ठिकाणी लोकांना तातडीने मदत पोहोचवणे, महामार्गाच्या परिसरात ट्रॉमा सेंटरची साखळी निर्माण करणे अशा अनेक उपाययोजना केल्या जाणार आहे, अशी माहिती सरनाईक यांनी दिली.
advertisement
 रोड हिप्नोसिस काय असतं? 
प्रताप सरनाईक यांनी रोड हिप्नोसिस या शब्दाचा उल्लेख केला आहे. खरंतर याला हायवे हिप्नोसिस (Highway Hypnosis) असं सुद्धा म्हटलं जातं. कार चालवताना ड्रायव्हर अशा स्थितीत पोहोचतो, त्याला समोर फक्त रस्ता दिसत असतो. त्याला वाटतं की वाहन योग्य प्रकारे चालू आहे. पण त्यावेळी ड्रायव्हर हा स्वतःच्या विचारांमध्ये किंवा एकाच प्रकारच्या दृश्यांमध्ये (उदा. लांब, सरळ रस्ता) इतका रमून जातो की त्याला गाडी चालवत असल्याचा जाणीवपूर्वक अनुभव येत नाही. त्याचे डोळे उघडे असतात, पण मेंदू बाहेरील माहितीवर प्रक्रिया करत नाही. ही एक प्रकारची ट्रान्ससारखी (trance-like) अवस्था असते, अशातच अपघाताची परिस्थिती निर्माण होते.
advertisement
असं का होतं?
एवढंच नाहीतर  तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसे पोहोचलात, हे तुम्हाला आठवत नाही. तुम्ही गाडी किती अंतर चालवली, हे लक्षात येत नाही. रस्त्याच्या बाजूने गेलेल्या महत्त्वाच्या खुणा किंवा ठिकाणं तुम्हाला आठवत नाहीत. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या वाहनांकडे आणि संकेतांकडे लक्ष न देता गाडी चालवत राहता.  ही अवस्था सामान्यतः लांब, सरळ आणि एकसमान रस्ते (उदा. हायवे) किंवा रात्रीच्या वेळी गाडी चालवताना उद्भवू शकते. या अवस्थेमुळे अपघात होण्याची शक्यता वाढते, कारण अचानक आलेल्या धोक्याला किंवा बदलाला प्रतिसाद देणे अवघड जातंय.
advertisement
हे टाळण्यासाठी काय करावं?
लांब प्रवासात वेळोवेळी थांबा.
पुरेशी झोप घेऊनच गाडी चालवा.
गाडीत तुमच्या आवडीचे संगीत किंवा पॉडकास्ट ऐका.
एकाच स्थितीत बसण्याऐवजी थोड्या वेळाने शरीराची हालचाल करा.
प्रवासात एकटे असल्यास सोबतीला कोणालातरी घ्या.
मराठी बातम्या/ऑटो/
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी' वर अपघात का होतात? पहिल्यांदाच महायुतीच्या मंत्र्याने सांगितलं कारण
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement