'ही' आहे देशातील सर्वात बेस्ट 250CC बाइक! किंमत फक्त 1,26,690 रुपयांपासून सुरू
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Best 250 CC Bikes in India: सध्या बाजारात 250cc सेगमेंट तेजीत आहे. यामध्ये पॉवर, स्टाइल आणि किंमतचं जबरदस्त बॅलेन्स मिळतं. आज आपण अशाच बाइक्सविषयी जाणून घेणार आहोत.
मुंबई : सध्या मार्केटमध्ये 250cc सेगमेंट या वेगाने प्रसिद्ध होत आहेत. ज्यामध्ये चांगली पावर मिळते, स्टाइलही भारी आणि बॅलेन्सही उत्तम मिळते. या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर टीव्हीएस रोनिन आहे. ही एक मॉडर्न-रेट्रो बाइक आहे. ज्यामध्ये स्क्रॅम्बलर आणि क्रूझरचं एक यूनिक मिश्रण मिळतं. याचं राउंड LED हेलडँप, T शेपचं DRL आणि गोल्ड फिनिशचं USD फोर्क्स याला रस्त्यांवर प्रीमियम लूक देते. ही बाइक अशा लोकांसाठी आहे, ज्यांना शहरात स्टाइलमध्ये फिरायचं आहे. तसंच कधी-कधी लाँग ड्राइव्हवरही जायचंय. या बाइकची सुरुवातीची किंमत 1,26,690 रुपये आहे.
यामध्ये 225.9cc इत ऑइल-कूल्ड इंजिन मिळतं. जे खुप रिफाइंड आहे. हे 20.4 PS ची पॉवर आणि 19.93 Nm टार्क जनरेट करते. जे लो-एंड क्रंटसाठी प्रसिद्ध आहे. फीचर्सविषयी बोलायचं झाल्यास, यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, स्लिपर क्लच आणि दोन एबीएस मोड (अर्बन आणि रेन) मिळतात. ज्यामुळे ती रोजच्या वापरासाठी खुप सुरक्षित आणि आरामदायक बनते.
advertisement
KTM 250 Duke
ही बाइक आपल्या शार्प आणि अॅग्रेसिव्ह लूकसाठी ओळखली जाते. नवीन जनरेशनच्या Duke मध्ये 1290 Super Duke सारखी डिझाइन पाहायला मिळते याचे मस्कुलर फ्यूल टँक आणि बोल्ड ग्राफिक्समुळे ती एक प्रॉपर ‘स्ट्रीट-फायटर’ बाइक बनते. तुम्हाला गर्दीमध्ये उठून दिसायचं आणि वेगाने गाडी चालवायला आवडत असेल तर या बाइकची डिझाइन तुम्हाला खुप आवडेल. ही बाइक 2,13,618 च्या सुरुवातीच्या एक्स शोरुम किंमतीत खरेदी करू शकता.
advertisement
या बाईकमध्ये 249cc, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे, जे 31 PS पॉवर आणि 25 Nm टॉर्क देते. ही तिच्या सेगमेंटमधील सर्वात पॉवरफूल बाइक्सपैकी एक आहे. यामध्ये क्विकशिफ्टर, राइड-बाय-वायर आणि नवीन टीएफटी डिस्प्ले यांसारखी आधुनिक फीचर्स आहेत. उच्च वेग आणि स्पोर्टी हँडलिंगच्या शोधात असलेल्या तरुण रायडर्ससाठी ही बाईक अगदी योग्य आहे.
advertisement
Bajaj Pulsar N250
ही बाइक आपल्या मस्कुलर बॉडी आणि फ्यूचरिस्टिक LED प्रोजेक्टर हेडलँपसह एक भारी छाप पाडते. तिचे डिझाइन आकर्षक आहे, सोनेरी रंगाचे USD फोर्क्स तिच्या प्रीमियम लुकमध्ये भर घालतात. पल्सर ब्रँडचा विश्वास आणि आधुनिक लुक यामुळे ती कॉलेजवयीन तरुण आणि ऑफिसला जाणाऱ्यांमध्येही प्रसिद्ध आहे. कंपनी ही बाईक 1,34,402 रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत विकते.
advertisement
या बाइकचे 249cc ऑइल-कूल्ड इंजिन 24.5 PS पॉवर आणि 21.5 Nm टॉर्क निर्माण करते. यामध्ये आता ट्रॅक्शन कंट्रोल आणि डिजिटल कन्सोल यांसारखी नवीन फीचर्स आहेत. बजाजने याला शहरातील ट्रॅफिकमध्ये चालवण्यासाठी सोपे आणि अत्यंत मायलेज फ्रेंडली बनवलेय.
Hero Xtreme 250R
यासह हिरोने 250cc सेगमेंटमध्ये जबरदस्त एंट्री केलीये. या बाइकचे डिझाइन खुप रुंद आणि मस्कुलर आहे. ज्यामध्ये हंकी फ्यूल आणि शार्प एलईडी लायटिंग दिली गेलीये. ही बाईक खुप प्रीमियम दिसते. याची सीटिंग पोझिशन स्पोर्टी आहे यासोबत लाँग ड्राइव्हसाठीही आरामदायक आहे. या बाइकची सुरुवातीची एक्स शोरुम किंमत 1,67,344 रुपये ठेवण्यात आली आहे.
advertisement
Xtreme 250R मध्ये 249cc, लिक्विड-कूल्ड, DOHC इंजिन आहे. हे पॉवरट्रेन 30 PS पॉवर आणि 25 Nm टॉर्क निर्माण करते. ज्यामुळे ती KTM ला एक प्रबळ स्पर्धक ठरते. यामध्ये स्विच करण्यायोग्य ABS, लॅप टायमर आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यांसारख्या फीचर्सचाही समावेश आहे. यामुळे, कमी किमतीत उत्कृष्ट परफॉर्मेंसच्या शोधात असणाऱ्यांसाठी हा एक भारी ऑप्शन आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 21, 2026 4:19 PM IST








