HF Deluxe, Shine 100 की Platina 100, रेजच्या वापारासाठी बेस्ट बाइक कोणती? खरेदीपूर्वी घ्या जाणून
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
रोजच्या वापरासाठी सध्याच्या काळात बाइक महत्त्वाची आहे. तुम्हालाही बाइक घ्यायची असेल पण कोणती घ्यावी कळत नसेल तर आज आपण तीन बाइक्सविषयी जाणून घेऊया.
मुंबई : भारतातील जास्तीत जास्त लोक हे आपल्या रोजच्या प्रवासासाठी बाइकचा वापर करतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला ऑफिस किंवा कॉलेजला जायचं असेल तर आपलं वाहन असणं अनेकदा सोयीस्कर ठरतं. भारतात 100cc ची बाईक ही सर्वाधिक पसंत केली जाते. याच कारण म्हणजे ती स्वस्त असते आणि चालवण्यास सोपी असते.
या बाइक जवळपास सारख्याच दिसतात. पण यांचे फीचर्स आणि मायलेजमध्ये फरक आहे. म्हणूनच मोटरसायकल खरेदी करताना योग्य विचार करुन खरेदी करणं महत्वाचं ठरतं. जेणेकरुन तुम्ही योग्य बाइक खरेदी करू शकाल आणि भविष्यात तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल.
सर्वात स्वस्त कोणती?
मोटरसायकल खरेदी करताना आपलं बजेट लक्षात घेणं खुप महत्त्वाचं ठरतं. तुमचंही बजेट कमी असेल तर Hero HF Deluxe सर्वात स्वस्त बाईक आहे. याची सुरुवातीची किंमत 57,657 रुपये आहे. जी याला सर्वात परवडणारी बनवते. Honda Shine 100 ची किंमत जवळपास 65,243 रुपये आहे. तर Bajaj Platina 100 ची किंमत जवळपास 66,015 रुपयांपासून सुरू होते. म्हणजेच किंमतीच्या बाबतीत HF Deluxe सर्वात पुढे आहे. तर बाकीच्या दोन्ही बाइक या थोड्या महाग आहेत.
advertisement
इंजिन आणि परफॉर्मेंसमध्ये कोणता फरक?
या तिन्हीही बाइक्सचं इंजिन हे खुपच लहान आहे. ज्यामुळे ही बाइक वेगाने चालत नाही. पण स्मूद राइड आणि आरामदायक प्रवासासाठी या बाइक बेस्ट ठरतात. HF Deluxe मध्ये 97.2cc इंजिन मिळते. हे रोजच्या वापारासाठी बेस्ट आहे. Honda Shine 100 मध्ये 98.98cc इंजिन दिलंय. ज्यामुळे स्मूद राइडसाठी ती बेस्ट ठरते. तर Bajaj Platina 100 मध्ये 102cc इंजिन आहे. हे इंजिन इतर दोन बाइकपेक्षा जास्त पॉवर देते. मात्र तिन्हींचा परफॉर्मेंस जवळपास सारखाच आहे.
advertisement
मायलेज कोणाचं जास्त?
या तिन्हीपैकी कोणती गाडी सर्वात जास्त मायलेज देते? तर यामध्ये पहिला क्रमाक हा Bajaj Platina 100 चा लागतो. खऱ्या वापरात ही 70-75 kmpl मायलेज देऊ शकते. Hero HF Deluxe ही जवळपास 70 kmpl मायलेज देते. हे तुमच्यासाठी खुप चांगलं आहे. Honda Shine 100 चं मायलेज 55-65 kmpl दरम्यान आहे. जे इतरांच्या तुलनेत थोडं कमी आहे. तुम्हाला रोज दूरचा प्रवास करायचा असेल तर Platina आणि HF Deluxe बेस्ट ठरते.
advertisement
कंफर्ट आणि राइड क्वालिटी कशी मिळते?
आता पाहूया की, या तिन्हीपैकी कोणती गाडी जास्त कंफर्टेबल आहे. यात Bajaj Platina 100 सर्वात वर आहे. यात खास सस्पेंशन दिलेय. जे खराब रस्त्यांवर धक्के कमी करते. HF Deluxe ही आरामदायक आहे. Honda Shine 100 थोडी हलकी आहे. ज्यामुळे ती ट्रॅफिकमध्ये चालवणं सोपं होतं. पण यात कंफर्ट थोडा कमी जाणवतो.
advertisement
सेफ्टी आणि डिझाइन कोणाची भारी?
या तीन्हीही बाईक्समध्ये सेफ्टी फीचर्स दिलेय. यात जॉइंट ब्रेकिंग सिस्टम आहे. HF Deluxe आणि Shine 100 मध्ये साइड-स्टँड इंजिन कट-ऑफ फीचरही मिळतं. जे सेफ्टी वाढवते. डिझाइनविषयी बोलायचं झाल्यास, HF Deluxe चा लूक सिंपल आहे. Shine 100 ही थोडी प्रीमियम दिसते. तर Platina ही मजबूत डिझाइनसह येते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 26, 2026 3:36 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
HF Deluxe, Shine 100 की Platina 100, रेजच्या वापारासाठी बेस्ट बाइक कोणती? खरेदीपूर्वी घ्या जाणून









