advertisement

आधी घर घेतलं अन् आता... महिन्याभरातच अंकिता वालावलकरची दुसरी गुडन्यूज! आमिर खानसोबत मोठ्या प्रोजेक्टमध्ये करणार काम

Last Updated:

Ankita Walawalkar with Aamir Khan: अंकिता वालावलकरने नुकतंच बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत भेट घेतली असून यासंबंधीचे फोटो आणि व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

News18
News18
मुंबई: सोशल मीडियावर आपल्या मालवणी कंटेन्टमुळे नेहमी चर्चेत असणारी बिग बॉस मराठी फेम अंकिता वालावलकर आता एका नव्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर कोकणहार्टेड गर्ल या नावाने लोकप्रिय असलेली अंकिता तिच्या रोखठोक भूमिकांसाठी ओळखली जाते. अनेकदा ती तिच्या आयुष्यातील घडामोडी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशातच अंकिताच्या नव्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं असून आता तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अंकिता वालावलकरने नुकतंच बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत भेट घेतली असून यासंबंधीचे फोटो आणि व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्यांच्या या भेटीचे फोटो व्हायरल होताच अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सर्वांना जाणून घ्यायचंय की अंकिताने आमिर खानची भेट का घेतली? ती आमिर खानच्या एखाद्या फिल्मचा भाग असणार आहे की, आमिरने तिच्या रिसॉर्टला भेट दिली आहे? तुम्हालाही हे प्रश्न पडले आहेत का? तर थांबा. स्वतः अंकिताने तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये आमिर खानसोबतच्या भेटीसंदर्भातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरं दिली आहेत.
advertisement

अंकिता आणि आमिर खानच्या भेटीचं कारण काय?

अंकिताने आमिरसोबतचे फोटो शेअर करताना लिहिलं, "आमिर खान यांच्या विचारांमध्ये असलेली स्पष्टता आणि समाजासाठी काहीतरी अर्थपूर्ण करण्याची त्यांची जिद्द मनाला खूप भावली. आता त्यांच्या Paani Foundation @pani_foundation_india सोबत मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काम करण्याची संधी मला मिळत आहे, ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आणि अभिमानाची बाब आहे. कोकण हा निसर्गाने नटलेला प्रदेश असला तरी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची गरज इथेही तितकीच महत्त्वाची आहे. अशा वेळी पाणी फाउंडेशनसारख्या उपक्रमाचे कोकणात प्रथमच आगमन होणे, ही अत्यंत आनंदाची आणि सकारात्मक सुरुवात आहे."
advertisement
अंकिताने पुढे लिहिलं, "या उपक्रमाच्या माध्यमातून आपण अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून, त्यांना सक्षम बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. कोकणातून सुरू झालेली ही वाटचाल महाराष्ट्रभर नवी ऊर्जा आणि आशा निर्माण करेल, असा मला विश्वास आहे."
advertisement

आमिर खानच्या पाणी फाउंडेशनशी जोडली अंकिता

आमिर खान आणि किरण राव यांनी २०१६ साली पाणी फाउंडेशनची स्थापना केली होती. या फाउंडेशनच्या माध्यमातून ते महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. अशातच अंकिताच्या पोस्टमधून हे स्पष्टपणे दिसून आलं आहे की ती आता आमिर खान आणि किरण राव यांच्या पाणी फाउंडेशनशी जोडली गेली असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरून काम करण्यासाठी ती सज्ज झाली आहे. आमिर खान यांनीही अंकिताच्या उत्साहाचं कौतुक केलं असून, कोकणातील शेतकऱ्यांचे प्रश्न आता केवळ ऐकले जाणार नाहीत, तर त्यावर प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम केलं जाईल, असा विश्वास अंकिताने व्यक्त केला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
आधी घर घेतलं अन् आता... महिन्याभरातच अंकिता वालावलकरची दुसरी गुडन्यूज! आमिर खानसोबत मोठ्या प्रोजेक्टमध्ये करणार काम
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement